FAQ

sbfied online exam login and registration

OnlineTest by SBfied.com ह्या उपक्रमात आपण सहभागी होऊ इच्छिता त्याबद्दल सर्वात आधी तुमचे अभिनंदन. कारण अडचणी आल्यानंतरच ह्या पेज पर्यंत पोहचण्याची लिंक तुम्हाला मिळाली असेल.

आणि अडचण येऊन देखील तुम्ही उपक्रमात सहभागी होऊ इच्छिता ही खरंच अभिनंदनास पात्र गोष्ट आहे.

तुम्हाला येणाऱ्या अडचणी त्यांचे समाधान याप्रमाणे आहे.

ह्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक का आहे?

– तसा हा उपक्रम सर्व तयारी करणाऱ्या मित्रांसाठी फ्री आहे. परंतु एकाच वेळी सर्वांना टेस्ट ची लिंक मिळत असल्यामुळे एकावेळी खूप मित्र टेस्ट देण्याचा प्रयत्न करतात. ही संख्या खूप जास्त असेल तर टेस्ट देताना स्पीड कमी होणे, result न दिसणे अश्या अडचणी येतात. ह्या अडचणी सोडवण्यासाठी काही टेस्ट आधी नोंदणी कृत उमेदवारांना दिल्या जातील.आणि मगच टेस्ट सर्वांसाठी खुल्या असतील.

2. माझी नोंदणी झाली आहे पण लॉगिन होत नाही काय करू?

तुम्ही नोंदणी केल्यानंतर लगेचच लॉगिन करण्याचा प्रयत्न करत असाल तर लॉगिन होणार नाही. तुमची नोंदणी झाली असेल पण अकाउंट सक्रिय होण्यासाठी 2 तास ते 2 दिवस इतका कालावधी लागू शकतो. ह्या कालावधीत तुम्हाला लॉगिन करता येणार नाही. अकाउंट सक्रिय झाले की तुम्ही लॉगिन करू शकता.

मी माझा पासवर्ड विसरलो आहे काय करू?

पासवर्ड विसरणे सोपे नाही कारण तुमचा पासवर्ड हे तुमचे जन्म वर्ष आहे. समजा माझी जन्म तारीख 14-07-1991 अशी आहे तर माझा पासवर्ड 1991 असा असेल. तुमचा मोबाईल क्र. आणि जन्म वर्ष टाकून तुम्ही लॉगिन करू शकता.