Police Bharti Question Paper 43By Sagar Sir | SBfied.com / 07/01/2020 1. एका टाकीला जोडलेला नळ टाकी 16 तासात भरतो मात्र टाकीला असणाऱ्या एका छिद्रामुळे टाकी 48 तासात भरते तर संपूर्ण भरलेली टाकी ते छिद्र किती तासात रिकामी करू शकेल? 16 12 24 32 2. कोणत्या कलम नुसार ग्राम पंचायती राज्यसरकार द्वारा स्थापन करण्यात आल्या? 44 80 51 40 3. संख्या मालिका पूर्ण करा 1 10 25 46 73 106 ? 145 124 133 155 4. खालील पैकी कोणत्या संख्येचे वर्गमूळ आणि घनमूळ असे दोन्हीही काढता येईल? 625 1000 125 64 5. पिकते तिथे विकत नाही या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? जिथे वस्तू तयार होते तिथे ती चांगल्या प्रकारे विकल्या जाते ज्या ठिकाणी वस्तू तयार होते तिथे तिला जास्त महत्त्व नसते जिथे वस्तू पिकवल्या जाते तिथे ती विकता येत नाही पिकलेली वस्तू लवकर विकत नाही 6. पश्चिमेकडे तोंड करून उभा असणाऱ्या व्यक्तीच्या डाव्या हाताला जी दिशा आहे तिची विरुद्ध दिशा कोणती? पश्चिम उत्तर दक्षिण पूर्व 7. अस्वस्थता : डॉक्टर : : असुरक्षितता : ? संरक्षण वकील पोलीस ग्रंथालय 8. देशात एकूण कटक मंडळांची संख्या किती आहे? 28 7 62 13 9. मोठा भाऊ लहान भावापेक्षा 2 वर्षाने मोठा आहे आणि दोघांच्या वयाची बेरजेची दुप्पट 60 आहे तर लहान भावाचे वय किती वर्ष असेल? 14 18 16 12 10. जो तुम्हाला संकट काळी मदत करेल तोच तुमचा खरा मित्र – वाक्याचा प्रकार ओळखा स्वार्थी वाक्य विध्यर्थी वाक्य संकेतार्थ वाक्य आज्ञार्थी वाक्य 11. माझ्या बहिणीच्या आईच्या भावाच्या बायकोच्या मुलीचा भाऊ माझा कोण लागत असेल? मावस भाऊ मामेभाऊ आतेभाऊ मामा 12. प्रभाराचा विचार केला असता …….. हे उदासीन असतात न्यूट्रॉन न्यूक्लियस इलेक्ट्रॉन प्रोटॉन 13. खालील पैकी कोणता शब्द विशेषण आहे खाली गरीब श्रीमंती गरिबी 14. एका पुस्तकावर छापलेली किंमत 400 रुपये आहे दुकानदार त्यावर 20 % सूट देऊन ते पुस्तक देतो आणि मग नेहमीच्या ग्राहकाकडून 20 रुपये कमी घेतो तर ते पुस्तक नेहमीच्या ग्राहकाला किती रुपयांना मिळेल? 320 300 360 280 15. माझे मित्र मला प्रेमाने बोलवत होते – या वाक्याचे पूर्ण भूतकाळात रुपांतर करा माझ्या मित्रांनी मला प्रेमाने बोलावलेले होते माझे मित्र मला प्रेमाने बोलावतात माझ्या मित्रांनी मला प्रेमाने बोलावले माझे मित्र मला प्रेमाने बोलावत असतात Loading … Question 1 of 15