तुम्ही सकाळी रनिंगला जाता ना?
मग ही बातमी नक्की वाचा.
खूप मोठा धोका आहे हा !

फिजिकलची तयारी करणाऱ्या एका भावी पोलिसाला वाहनाने धडक दिली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला ही बातमी सकाळी वाचली.
आधीच तुमच्या आयुष्यात अडचणी खूप आहेत त्यात अशा घटना आणखी अडचणी निर्माण करत असतात.
लक्षात घ्या – सर सलामत तो पगडी पचास…
असे वाटू देऊ नका की – असे प्रत्येकवेळी घडते का? एका मित्राचा जीव गेला आहे – कोणाचा हात पाय जाऊ शकतो. आयुष्यभरासाठी अपंग होऊन बसाल.
पण म्हणून रनिंग बंद करायची का?
तयारी तर करावी लागणारच आहे पण मग असे होऊ नये याचीही काळजी घ्यावी लागेल. जिवंत राहिलो तरच वर्दीचे स्वप्न पूर्ण होईल ना..
सर्वांसोबत असे घडणार नाही. पण ज्याच्यासोबत त्याचे तर आयुष्यचं संपले ना?
म्हणून मी खाली काही गोष्टी सांगतो त्या नक्की पाळा –
- सर्वात आधी रनिंगसाठी अशी ट्रॅक पँट घ्या ज्या पँटला रेडीअमचे पॅचेस असतील. या पॅचेस मुळे रात्री अंधारात गाडीच्या ड्रायव्हरला कोणीतरी समोर असल्याचे समजेल. यामुळे त्याला पुढे होणारा अपघात टाळता येईल.
- शक्यतो रनिंग साठी जातानी गटाने जा. एकावेळी अनेक लोकांचे लक्ष असल्यामुळे संभाव्य धोका टाळता येईल.
- शक्यतो सुसाट वेगाने जाणाऱ्या गाड्यांच्या रोडवर रनिंगसाठी जाऊ नका.
- आजूबाजूला शाळेचे मैदान किंवा पडीत शेत असेल तर त्याचा वापर रनिंग साठी करता येईल. असे ठिकाण लांब असेल तर तुम्ही त्या मैदानावर जाण्यासाठी सायकल किंवा स्वतःची गाडी वापरू शकता.
- गर्दीच्या ठिकाणी हेडफोन घालून रनिंग करू नका – हेडफोन मुळे तुम्हाला हॉर्न किंवा गाड्यांचा आवाज येणार नाही.
- रनिंगसाठी डार्क रंगाचे कपडे वापरू नका. पांढरी किंवा पिवळ्या शेडमध्ये असणारे कपडे वापरा. यामुळे अंधारातही तुमचा वावर वाहन चालकाच्या लक्षात येईल.
या सर्व गोष्टींची काळजी घ्या.
कारण
सर सलामत तो पगडी पचास….
जय हिंद मित्रांनो.. मी सागर सर.. आणि तुमचे पोस्टचे स्वप्न पूर्ण करणं हे माझे स्वप्न !!
लढत रहा पडत रहा आणि जोपर्यंत पोस्ट मिळत नाही तोपर्यंत परिस्थितीसमोर दंड थोपटत म्हणत रहा – ‘ मी पोस्ट मिळणारच आणि सर्वांची जिरवणारच ‘
एक दिवस तुमचा पराक्रम – तुमची पोस्ट तुमच्यासाठी खेचून आणेल. स्वतःवर विश्वास ठेवा.
Thanks sir
सर तुमचं आयुष्य खूप सुंदर व लांब असो करोडो सल जगा सर तुमची गरज आज निर्माण झाली आहे
Thank You Rohit
Thank you sir
खूप खूप धन्यवाद सर….
Ho sir
Thanks sir
Thank you Nitin
Thks so much sir and I promise ki aami jiv laun mehnat krnar
Thank uu sir
Thanks sir
thank sir
धन्यवाद!!!सर
Thank you sir .. जय हिंद सर माझं स्वप्न मी पूर्ण करेन .
Good
Thanks you sir
tya bhavi police la bhavpurna shraddhanjali
Very nice question
Thank you sir
Thank youu sir ashi ch navnavin mahiti aamhala det raha tumch sopn aamhi nakkich purn karo ….mnapasun aabhar sir …