12 तास काम करूनसुद्धा मिळवले 95 मार्क्स !

कामामुळे तुम्हाला अभ्यासाला वेळ मिळत नाही ना? काम करू की अभ्यास करू असे होते ना?


आता होऊ द्या.. एकदा हे आर्टिकल वाचले की नाही होणार

कारण आज मी भूषणची अभ्यासाची अशी ट्रिक सांगणार आहे – जिचा वापर करून त्याने 95 मार्क्स मिळवले – तब्बल 12 तास काम करून सुद्धा.

आणि हे फक्त तोच करू शकतो असे नाही तर तुम्ही सुद्धा करू शकता हे तुम्हाला हे संपूर्ण आर्टिकल वाचल्यावर समजेल.

हा भूषण कोण आहे?


मध्येच हा भूषण कोण आला बरं?
या सर्वात आधी भूषणची ओळख करून घेऊ. !
भूषण हा आपल्या पोलीस भरती चॅनल वर असणाऱ्या 140000 मित्रांपैकी एक आहे.

तुमच्या सारखाच 2018 पासून भरतीची वाट पाहणारा, लेखी आधी की फिजिकल आधी हा प्रश्न विचारणारा, ठोकळा वाचू की प्रश्नपत्रिका सोडवू या गोंधळात असणारा !

जेव्हा भरतीचे काही खरे दिसेना तेव्हा पोलीस भरतीची तयारी करत असताना भूषणला एक जॉब सुद्धा करावा लागला.

तो बारा तासाचा जॉब करतो आहे ( एका हॉटेलच्या रिसेप्शन काउंटर वर होता. हे त्याने मला फोन वर सांगितले ) हे ऐकून मात्र मला खात्री पटली की त्याचे अभ्यासावर नक्कीच दुर्लक्ष होणार.

पण काल परवा मी त्याला कॉल केला आणि तेव्हा मला समजले की या भूषणने पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत 95 मार्क्स घेतले आहे.

हे कसे शक्य आहे?

इथे सलग 5/6 तास अभ्यास करून सुद्धा 80 मार्क्स मिळत नाही तर या भूषणने 95 मार्क्स कसे घेतले असतील याचे मला सुद्धा आश्चर्य वाटले.

मग मी भूषणला त्याच्या अभ्यासाची पद्धत विचारली. आणि हो त्याने लपून न ठेवता इतरांना सांगितली सुद्धा !

आणि आज या आर्टिकलच्या माध्यमातून ती पद्धत तुम्हाला मी दाखवणार आहे.

भूषण कोणते काम करत होता?
हॉटेलच्या रिसेप्शन काउंटर वर नवीन आलेल्या ग्राहकांची एंट्री करणे, त्यांना काही माहिती हवी असेल तर ती पुरवणे यासारखी कामे असतात.

हे काउंटर असे असते की इथे खूप काम तर नसते पण काउंटर सोडून कुठेही जाता येत नाही. कारण कोणत्या वेळी कोणता ग्राहक माहिती विचारण्यासाठी काउंटरवर येईल हे सांगता येत नाही.

बऱ्याचदा दोन ग्राहकांमध्ये 10 मिनिटांचा, 15 मिनिटांचा वेळ असायचा.
म्हणजे एक ग्राहक एंट्री करून गेला तर दुसरा ग्राहक 10 – 15 मिनिटांनी यायचा.

इथे त्याने एक स्मार्ट टेक्निक वापरायची ठरवली.

टेक्निक काय होती?

समजा तुम्हाला असा 10/15 मिनिटांचा वेळ मिळाला तर तुम्ही काय करता बरं?

मी तर सरळ मोबाईल काढतो. पहिले व्हॉट्सॲप बघतो. मग लोकांच्या स्टेटस बघतो.

मग मला फेसबुक ची आठवण येते. तिथे दोन चार लाईक कमेंट मारून आलो की सरळ इंस्टाग्राम कडे वळतो.

इंस्टावर सुद्धा एक दोन लाईक असतात ते बघत बघत मी आता काय बघायचे याचा विचार करतो मग इतक्यात मला व्हॉट्सॲप वर एखादा रिप्लाय आलेला असतो. तो बघण्यासाठी पुन्हा मी व्हॉट्सॲप वर जातो.

मला हसू नका मित्रांनो, तुम्ही पण 10 मिनिटात हेच करता मला हे माहीत आहे कारण आपल्या सवयी सेम आहेत.

पण भूषण या दहा मिनिटात असे काहीतरी वेगळे करायचा की त्यामुळे त्याचे मार्क्स 75 वरून 95 पर्यन्त गेले.

या 10 मिनिटात भूषण एक टेस्ट सोडवायचा. त्याला वेळ मिळाला की तो सरळ टेलिग्रामवर यायचा. तिथे टेस्ट ची लिंक आलेली असायची.

( जर हे टेलिग्राम काय आहे? लिंक काय आहे? हे जर तुम्हाला माहित नसेल तर मात्र कमाल आहे राव तुमची! इतके पण दुर्लक्ष करू नका मित्रांनो ! गंमत केली – हे चॅनल तसे खूप फेमस नाही पण तयारी करणारे एक लाखापेक्षा जास्त मित्र आहेत त्यावर ! पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि ते चॅनल बघा )

टेलिग्रामवर मिळालेल्या लिंकवर क्लिक करून टेस्ट द्यायचा. टेस्ट फक्त 15 मार्कांची असायची आणि सोडवायला फक्त 7 मिनिट लागायचे. तीन मिनिटात काय चुकले काय बरोबर आले हे बघायचा.

त्याची एक खासियत होती की जे चुकले ते दिलेले स्पष्टीकरण वापरून लगेच तिथेच समजून घ्यायचा.

दिवसभरामध्ये त्याला असा 10/15 मिनिटांचा ब्रेक 4/5 वेळा तरी नक्की मिळायचा. यामध्ये त्याच्या 4/5 प्रश्नपत्रिका सोडवून व्हायचा आणि चुकलेले काही प्रश्न स्पष्टीकरणमुळे समजायचे !

त्याचे हे रुटीन सलग पाच-सहा महिने चालू होते. या पाच सहा महिन्यांमध्ये त्याने बऱ्याच प्रश्नपत्रिका सोडवल्या. अवघड वाटणारे बरेच प्रश्न समजून घेतले. आणि वेळ नसूनही त्याचा बऱ्यापैकी अभ्यास होत गेला.

( थोडे गणित करू बरं-
5 महिने = 150 दिवस !
रोज एक तास = 60 प्रश्न
150 x 60 = 9000 प्रश्न ! )

फक्त असा अभ्यास करून 95 मार्क मिळतील का?


हा प्रश्न तुम्ही मला विचारायला पाहिजे. सर फक्त टेस्ट सोडवून हे 95 मार्क्स मिळाले असतील का?

इकडे कान करा – तुम्हाला एक रहस्य सांगतो.
परीक्षेसाठी 3/4 तास अभ्यास सगळेच करतात. त्यामुळे सगळ्यांनाच सगळ्यांच्या इतकेच मार्क पडतात.

जसे जसे मेरिट लिस्ट येत आहे तुम्ही त्यामध्ये बघत असाल की 60 ते 80 यादरम्यान मार्क्स घेणारे भरपूर मित्र आहे. कारण हे सर्व मित्र रोज 3/4 तास अभ्यास करतात. यामुळे सर्वांचा अभ्यास तितकाच होतो. आणि यामुळे सर्वांना तितकेच मार्क पडतात.

95 मार्क्स घेण्यासाठी तुम्हाला तीन ते चार तास अभ्यास करावाच लागेल पण त्यासोबतच जो वेळ तुम्हाला मिळेल त्याचा वापर सुद्धा अभ्यासासाठीच करावा लागेल.

आपण जसे सोशल मीडिया वापरतो तसाच सोशल मीडियाचा वापर करत भूषण त्याला मिळणारा वेळ वाया घालू शकत होता पण त्याने तोही वेळ अभ्यासासाठी वापरला.

भूषणने आपल्या सोबत 3/4 तास अभ्यास केलाचं पण त्यासोबत मिळालेल्या वेळेचा वापर करत आपल्यापेक्षा जास्त अभ्यास केला.

आणि त्याचा परिणाम म्हणून जिथे साधारणपणे मुलांनी 60 ते 80 दरम्यान मार्क्स घेतले तिथे भूषणने 95 मार्क्स घेतले.

याशिवाय भूषणने अभ्यासात एक मस्त ट्रिक वापरली. ती काय आहे ते पुढे सांगतो.

भूषणची अभ्यासाची आणखी एक ट्रिक


त्याच्या म्हणण्यानुसार , तुम्हाला जर इतरांच्या पुढे जायचे असेल तर त्यांना येत नाही ते तुम्हाला यायला पाहिजे.

पोलीस भरती चा पेपर सोपा असतो त्यामुळे जास्त डीप अभ्यास करण्याची गरज नाही असे ज्ञान तुम्हाला भरपूर गुरु देत असतील.
त्यांचे थोडीफार प्रमाणात बरोबर आहे.
पण तुम्ही त्यांचा सल्ला ऐकला तर 100 पैकी 85 मार्क्स घेऊ शकता
पण पुढच्या पंधरा मार्कांसाठी तुम्हाला डीप अभ्यास करावाच लागेल.

85 मार्क घेणाऱ्या उमेदवाराला अपूर्णांकाची बेरीज करता येते परंतु भूषणला घातांकात अपूर्णांक दिलेला असेल तरी ते उदाहरण सोडवता येते.

वरवर अभ्यास करत तुम्ही अपूर्णांकाची बेरीज करू शकता पण मेरिटमध्ये येऊ शकत नाही. कारण काही मित्र तुमच्यापेक्षा जास्त अभ्यास करत इतरांचे जे प्रश्न चुकतात तेही कसे सोडवायचे हे शिकून घेतात.

फक्त पोलीस भरतीसाठी बनवलेल्या प्रश्नपत्रिका सोडवून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. आपल्या चॅनल वरती असणाऱ्या प्रश्नपत्रिका थोड्या अवघड आहेत – पण या प्रश्नपत्रिका त्याचा प्रश्नांच्या बनलेल्या आहे ज्यांच्यामुळे तुमसे मिरीट ठरणार आहे

कस्टमरला सुद्धा उत्सुकता होती!


ज्यावेळी पेपर झाला – त्या वेळी सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यामध्ये भूषण च्या हॉटेलवर नेहमी येणारे काही ग्राहक सुद्धा होते.

कारण जेव्हा बघावं तेव्हा भूषण हातात मोबाईल घेऊन काहीतरी आकडेमोड करत असायचा. त्याला बरेच लोक विचारायचे की तो काय करतो आहे – ज्यावेळी त्यांनी सांगितले की अभ्यास करतो आहे तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न दिसायचा –

“मोबाईलवर असा कोणता अभ्यास होऊ शकतो ? “

पण जेव्हा निकाल लागला – तेव्हा सर्वांना समजले की – भूषण मोबाईलवर खरंच अभ्यास करत होता.

भूषण ने कोणते पुस्तक वापरले?


आश्चर्य वाटेल पण शेवटच्या तीन महिन्यात भूषण कडे फक्त एकच पुस्तक होते.
ते म्हणजे चालू घडामोडीचे!

बाकी मराठी सामान्य ज्ञान गणित आणि बुद्धिमता यासाठी भूषणने फक्त टेस्ट सोडवल्या ! त्याही 10 10 मिनिटात.
त्याने आधी पुस्तकातून अभ्यास केला असेल पण शेवटच्या दिवसात मात्र त्याने आपल्या चॅनल वरील क्वालिटी टेस्ट वर भर दिला.

या टेस्ट क्वालिटी टेस्ट का आहे?

  1. कारण प्रत्येक टेस्टमध्ये वेगळा प्रश्न असतो
  2. प्रत्येक वेगळ्या प्रश्नाचे सोपे स्पष्टीकरण दिलेले असते
  3. टेस्टमध्ये सर्व प्रकरणे आणि सर्व प्रकरणातील सर्व संकल्पना येतील यावर भर दिलेला आहे
  4. नेहमीपेक्षा जास्त विचार करायला लावणारे प्रश्न टेस्टमध्ये असतात
  5. या टेस्ट सोडवणारे उमेदवार सोपा पेपर आला तर 95+ मार्क्स घेण्यासाठी तर तयार असतातच पण अवघड पेपर आला तरी 90+ मार्क्स घेण्याची क्षमता ठेवून असतात.
  6. या टेस्ट परीक्षेला लागणाऱ्या अभ्यासापेक्षा जास्त अभ्यास करून घेतात.

भूषणला पेपर कसा गेला?

अभ्यासाची ही पद्धत वापरून नेमका भूषण ला कसा फायदा झाला हे त्याला पेपर कसा गेला यावरून समजते.

90 मिनिटाचा पेपर 55 मिनिटात पूर्ण करून भूषण 35 मिनिटे वेळ संपण्याची वाट बघत होता. सिली मिस्टेक्स मुळे त्याचे 3 मार्क्स गेले नाहीतर आज तो 98 गुणांसह मेरिट लिस्ट मध्ये पुढे असता.

तुम्ही सुद्धा हे करू शकता


तुम्हाला असणारे काम करूनसुद्धा तुम्ही भूषणसारखे चांगले मार्क्स घेऊ शकता.

कामामुळे अभ्यासाला वेळ मिळत नाही हा प्रॉब्लेम सर्वांना असतो. काम आणि अभ्यास यामुळे बरीच ओढताण होते पण म्हणून प्रयत्न सोडायचे नसतात.

तुम्ही अभ्यास करत आहात तर त्याचा तुम्हाला नक्की फायदा होणार असतो. तुम्हाला फक्त तितके संयमी राहता यायला हवे.

एकदा आपण मोठे झालो की जबाबदाऱ्या वाढत असतात फक्त अभ्यासालाच वेळ देणे शक्य नसते. काहीतरी काम करावेच लागते.

कोणाला शेतात काम करावे लागते कोणाला घरच्या व्यवसायात मदत करावी लागते. कोणाला अक्षरशः मजुरीने कामाला जावे लागते.

पण म्हणून तुम्हाला लेखी परीक्षेत काही सूट मिळणार आहे का? मेरीट मध्ये फक्त मार्क्स बोलतात. तुमच्या अडचणी खूप असतील पण परीक्षा देताना आणि मेरीट लिस्ट तयार करताना त्याचा विचार होत नाही.

म्हणून ज्याचा विचार केला जात नाही ते कारणे सांगण्यात मजा नाही असे मला वाटते. इतिहास फक्त विजेता लक्षात ठेवतो.. त्याला काय काय अडचणी होत्या हे तो जिंकल्यावर सर्व विचारतात.

पराभूत योद्ध्याला काय अडचणी होत्या हे ऐकायला कोणालाच वेळ नसतो.

त्यामुळे मला वेळ नसतो हे सांगूच नका ! अभ्यास करणारा 10 मिनिटे वेळ काढून सुद्धा अभ्यास करू शकतो. आणि न करणाऱ्याला पूर्ण दिवस दिला तरी त्याचा अभ्यास पूर्ण होत नाही.

भूषण ने किती टेस्ट सोडवल्या असतील बरं?

3 महिन्यात त्याने 400 पेक्षा जास्त टेस्ट सोडवल्या आहेत! म्हणजे जवळपास 6000 उच्च दर्जाचे प्रश्न !!
या 6000 प्रश्नात पोलीस भरतीला येऊ शकणारे तर सर्वच प्रश्न असतील पण त्याही पेक्षा अवघड प्रश्न त्याचे सोडवून झाले असतील.

आपल्या साइटवर 500 पेक्षा जास्त टेस्ट सद्ध्या आहेत. खूप मित्र या टेस्ट रोज सोडवत असतात. तुम्ही रोज किती टेस्ट सोडवता?
एक दोन की तीन मला कमेंट मध्ये नक्की सांगा !

1 thought on “12 तास काम करूनसुद्धा मिळवले 95 मार्क्स !”

Leave a Comment

Your email address will not be published.

Don`t copy text!