का वर्दी मिळणार नाही?

मी सुद्धा सर्वांसारखा एक मोबाईलचा गुलाम !

रात्री तीन वाजता खोकला येऊन मला अचानक जाग आली.

म्हणून उठल्यावर पहिल्यांदा मोबाईल बघितला आणि सहज ऑनलाईन टेस्ट वर एक चक्कर मारायला गेलो.

रात्रीचे 3 वाजले होते.
आणि चक्कर मारताना मला एकदम आश्चर्य वाटले कारण –

आपल्या इतक्या मित्रांच्या चॅनलमधून फक्त एक मित्र टेस्ट सोडवत होता !

मी विचार केला – कोण असेल बरं हा?

कारण रात्री 3 वाजता मी सोशल मीडिया बघणार होतो आणि हा अभ्यास करत होता. !

” कोणीतरी खास नक्कीच असेल. जग झोपलेले असताना सराव करणारा हा खरा योद्धा असला पाहिजे ! “

प्रसिद्ध बॉक्सरचे एक प्रसिद्ध वाक्य आहे –

” मॅच होईपर्यंत मला झोपच येत नाही. कारण ज्यावेळी विश्रांती घेण्याचा विचार डोक्यात येतो..

त्यावेळी आठवते की मी झोपलेलो असताना माझा प्रतिस्पर्धी आणखी तयारी तर करत नसेल ना? आणि मी पुन्हा उठून तयारीला लागतो “

तुम्ही झोपुच नका असा याचा अर्थ नाही.

पण लक्षात घ्या तुम्ही झोपेत असताना कोणीतरी एका मार्कासाठी तयारी करत आहे.

हा तोच एक मार्क आहे ज्याने तुमचे मेरिट हुकणार असते.

विश्रांती घ्या – पण जेव्हा वेळ आहे तेव्हा अभ्यासचं करा. गणपती आहे, रविवार आहे हे कारणे देऊ नका.

मेरिट हुकुन घरी बसल्यावर हे कारणे सांगून बघा कोणी ऐकणार नाही. रिझल्ट बोलतो भावांनो.. कारणे कोणी ऐकत नाही.

बाकी त्या उमेदवारास माझ्याकडून खूप शुभेच्छा !
मित्रा तू खरा योद्धा आहेस. तू कोण आहे? तुझा किती अभ्यास झाला हे मला माहीत नाही. मात्र मला हे नक्की माहित आहे की – तुला वर्दी मिळविण्यापासून कोणी रोखू शकत नाही !

तुझ्यात ती क्षमता आहे. बस फक्त लढत रहा !

आणि इतर मित्रांनी –

जागरण करण्याची गरज नाही पण तुमच्याकडे दिवसा जितका वेळ आहे तो अभ्यासाला खर्च करत आहे ना याची खात्री करा.
दिवस कमी आहे आणि तयारी करणारे रात्रीचा वेळ सुद्धा वाया जाऊ देत नाहीये. तुम्ही आहे त्या वेळेचा चांगला वापर करत आहे ना?

3 thoughts on “का वर्दी मिळणार नाही?”

  1. Gaikwad Nilesh tanaji

    Sir mala Kahich mahite nahiye . Suruwat kuthun karaychi …. combined sathi kay lagat kay study material asat konte books gyawet kahich nahi mahit…. Pan tari mala Khakee wardi hawiye pls help me

    1. निलेश, Combine साठी स्टडी plan कसा असावा यावर एक सविस्तर पोस्ट प्रकाशित करण्यात येईल. त्यापूर्वी जर तुम्ही बेसिक पासून तयारी करणार असाल तर पुस्तकांची सखोल माहिती सांगणारी खालील पोस्ट वाचा .
      उपयुक्त पुस्तके – पोलीस भरती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!