Testimonials [काही प्रतिक्रिया ]


श्री. गजानन टेकाळे

(शिक्षक, नवोदय क्लास हिवरा आश्रम ता. मेहकर जि. बुलडाणा) मु. पो. भुमराळा ता. लोणार जि. बुलडाणा -443202

ग्रामीण भागातील मुलांना क्लाससाठी शहरात आल्याशिवाय पर्याय नाही आणि शहरातील खर्च गरिब परिस्थिती असलेल्या मुलांना परवडत नाही, यामुळे आपण सुरु केला हा उपक्रम ग्रामीण भागातील मुलांना खरोखरच कुठेतरी मार्ग दाखवणारा व घडवणारा आहे. आपण चालू केलेली फ्री टेस्ट ही सुद्धा मुलांना ग्रामीण भागात घरच्या घरी तयारी करुन घेणारी एक पर्वणीच आहे. आज कित्येक विद्यार्थी तुमच्यामुळे यशाचा डोंगर चढून पार करताहेत, अभिनंदन करतो तुमचे या उपक्रमाबद्दल, शतशः आभारी आहे सर….”


श्री.मोहन काळे सर

(ध्येय करिअर ॲकॅडमी जालना, घाटी रोड गणेश मंदिरासमोर Contact No 7796765044 9022340995 )

मोहन अंगद काळे (संचालक ध्येय करिअर अकॅडमी जालना). मु. पो. भुम . जिल्हा . उस्मानाबाद.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्लास करण्यासाठी पुणे, औरंगाबाद अश्या मोठ्या शहरात आल्याशिवाय पर्याय नाही. आणि एवढ्या मोठ्या सिटीतला खर्च गरीब मुलां मुलींना परवडणारा नाही.
तसे बघितले तर पोलीस भरती, सरळसेवा ची तयारी करणाऱ्या मुलांना क्लास लावल्या शिवाय पर्याय नाही त्यामुळं काही विद्यार्थ्यांची घरची परिस्थिती बेताची असल्याने क्लास ही लावता येत नाही .
यामुळे आपण सुरू केलेला हा उपक्रम खूप छान आहे. आज स्पर्धा परीक्षा देणारे मुल मुली12 लाखापेक्षा जास्त आहेत त्यात तुम्ही 40 ते 50 हजार विद्यार्थ्यांना तुम्ही घरी अभ्यासासाठी मदत करत आहात. आपण चालू केलेली फ्री टेस्ट ही सुध्दा ग्रामीण भागात घरच्या घरी तयारी करून घेणारे एक नवीन साधन आहे. गरीब, शेतकरी,मजूर आणि अनेक कुटुंबातील विद्यार्थ्यांचे तुम्ही जीवन घडवत आहात त्यामुळं मी तुमचा शतः श आभारी आहे.


श्री.अमोल वाघमोडे

सर, मी अमोल वाघमोडे तुमचे आभार मानतो कारण कि तुम्ही जी पोलीस भरती Test घेत आहे याचा आम्हाला खूप फायदा होतो कारण की ही test मोफत आहे व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दररोज पोहचत आहे. या test चा अजून एक फायदा म्हणजे चुकलेले प्रश्न स्पष्टीकरण करून देतात .खरोखरच हे एक महान कार्य तुम्ही करत आहात धन्यवाद सर. असेच कार्य चालू ठेवा धन्यवाद.”

Don`t copy text!