Free :
 • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

5000 रू किमतीचे बक्षीस चॅनेलच्या सदस्यांसाठी

5000 रू किमतीचे बक्षीस चॅनेलच्या सदस्यांसाठी….

सर्वप्रथम सर्व भावी पोलिसांचे जाहीर आभार !

मित्रांनो आपण 100000 ( एक लाख ) सदस्यसंख्येच्या टप्पा नुकताच पार केला.

वर्गातील 40 विद्यार्थ्यांनी आपल्याला सर म्हणावे आणि आपणही त्या लहान मुलांच्या आयुष्याला आकार द्यावा यासाठी खरंतर मी शिक्षक होण्याचे स्वप्न बघितलं होतं

परंतु शिक्षक होण्यापूर्वीच नोकरीची दुसरी मिळालेली संधी माझं हे स्वप्न तसेच मागे ठेवत होती. आणि म्हणून मी शिक्षक झालो नाही.

परंतु आपण शिक्षक जरी होऊ शकलो नाही तरी आपल्या सारख्या ग्रामीण भागातील धडपडणाऱ्या , परिस्थितीने नाजुक असणाऱ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मित्रांचा ‘ एक अभ्यास करून घेणारा मित्र ‘ नक्कीच होऊ शकतो. हे मात्र अगदी पक्के माहीत होते.

आणि त्यातूनच 2 वर्षांपूर्वी आपल्या पोलीस भरती चॅनेल ची कल्पना जन्माला आली.

पोटापाण्याची व्यवस्था झाल्यामुळे या चॅनेलच्या माध्यमातून पैसे कमवावे हा विचार मनामध्ये नव्हताच. 50 मुलांच्या ग्रुप मधून एखादे गणित समजून सांगितल्यानंतर पाच-सहा मुलांचे ‘ थँक्यू म्हणणारे ‘ मॅसेज यायचे तेव्हाच समजले की यातच आपला खरा आनंद आहे.

मग रिकाम्या वेळेत ‘ थँक्यू ‘ मिळवण्याचे सुरू झाले आणि त्यासोबतच भरपूर आनंद समाधानही मिळत गेले. माझे समाधान आणि त्यासोबत समाधानी मित्रांमुळे चॅनेल ची सदस्य संख्या आपोआप वाढायला लागली.

50… 100…10000…आणि आता एक लाख सदस्य संख्या हे याचेच फळ आहे.

police-bharti-telegram-channel-growth-record
Information source : https://telemetr.io/

मित्रांनो मी शिक्षक झालो नाही म्हणून काय झाले? पण आज या ग्रुपच्या चॅनेलच्या माध्यमातून माझे शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.

यासाठी तुम्हा सर्वांचे आभार.

माझे आभार व्यक्त करणे इथेच थांबत नाही..
मला त्यासाठी तुम्हाला काहीतरी द्यावे लागेल.

आणि म्हणून माझ्या ऐपतीप्रमाणे मी आपल्या चॅनेलच्या काही सदस्यांना अभ्यासाला उपयुक्त ठरेल अशी पुस्तके देणार आहे.

गिफ्ट ची एकूण रक्कम 10 x 500 = 5000 रू.

हे पुस्तकाचे गिफ्ट 10 मित्रांना देण्यात येईल. पुस्तकाची किंमत 500 रू पर्यंत असेल. ( या किमतीत बसणारे तुम्ही तुमच्या आवडीचे पुस्तक आणि उरलेली रक्कम कॅश स्वरूपात मिळवू शकता )

पण नेमकी ही पुस्तके कोणाला द्यायचे? हे ठरवणे कठीण आहे म्हणून यावर उपाय म्हणून खालीलप्रमाणे व्यवस्था केली आहे.

चॅनेल ची सदस्य संख्या 1 लाख झाल्याबद्दल पुस्तक भेट :

हे पुस्तकाचे गिफ्ट कोणाला मिळू शकेल?

 1. तुम्ही या चॅनेलचे सदस्य असायला हवे
 2. या चॅनेलचा पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला फायदा होतो आहे असे तुम्हाला मनातून वाटायला हवे.

पुस्तकाचे गिफ्ट कोणाला मिळेल हे कसे ठरेल?

मित्रांनो हे ठरवणे जरा कठीण आहे. म्हणून त्यासाठी लकी ड्रॉ ची व्यवस्था केली आहे.

ज्यांना ज्यांना या पुस्तकाच्या गिफ्ट लकी ड्रॉमध्ये सहभागी व्हायचे असेल त्यांना सर्वात खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपली प्रतिक्रिया द्यायची आहे. ( ही प्रतिक्रिया तुम्हाला या चॅनेलचा अभ्यासासाठी किती फायदा झाला हे सांगणारी असावी )

आलेल्या सर्व प्रतिक्रियांमधून योग्य प्रतिक्रिया निवडून त्यामधून लकी ड्रॉ पद्धतीने विजेत्यांची निवड केली जाईल.

तुमच्या मनाला विचारुन जे वाटते ते प्रतिक्रियेत लिहा आणि जर काहीच सुचत नसेल तर खालील मुद्द्यांचा आधार घेऊ शकता

बक्षिसासाठी निवडण्यात येणारी प्रतिक्रिया कशी असावी?

 1. प्रतिक्रिया ही पूर्णपणे प्रामाणिक आणि सत्यता सांगणारी असावी.
  चॅनेल बद्दल किंवा माझ्याबद्दल असत्य परंतु भरपूर चांगले लिहिलेली प्रतिक्रिया नसावी.
  (ऑफकोर्स तुम्हाला माझा हा प्रयत्न चांगला वाटत असेल तर तुम्ही चांगले लिहू शकता फक्त त्यात खोटेपणा नसावा )
 2. प्रतिक्रिया कमीत कमी 40 – 50 शब्दांमध्ये व्यक्त केलेली असावी.
 3. तुम्हाला आपल्या चॅनेल वरती मिळणाऱ्या प्रश्नांचा टेस्टचा खरोखर फायदा होत आहे असे वाटत असेल तरच प्रतिक्रिया लिहावी.
 4. खोटी स्तुती असणारी प्रतिक्रिया ग्राह्य धरली जाणार नाही.

प्रतिक्रियेमध्ये तुम्ही खालील मुद्यांचा समावेश करू शकता

 1. आपल्या ग्रुप वरती होणाऱ्या टेस्ट प्रश्न यांनी तुमच्या अभ्यासात कशा प्रकारे सुधारणा केली ?
 2. बाजारात उपलब्ध असणारे भरपूर पुस्तके, भरपूर नोट्स यांच्या तुलनेत आपल्या चॅनेल वरती होणाऱ्या टेस्टचा तुम्हाला कसा फायदा होतो आहे?
 3. आपण रोज घेत असलेल्या टेस्टबद्दल तुम्हाला कोणत्या गोष्टी चांगल्या वाटतात?
 4. विचार करायला लावणारे प्रश्न, सोपे वाटणारे परंतु अवघड असणारे प्रश्न, थोड्या फरकाने उत्तर चुकणारे प्रश्न यांचा समावेश आपल्या टेस्टमध्ये नेहमीच होत असतो. या प्रश्नांमुळे तुम्हाला अभ्यासात कसा फायदा होतो आहे?
 5. आणि विशेष म्हणजे पोलीस भरती आणि इतर क वर्गाच्या परीक्षांच्या तयारीसाठी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून टेस्टद्वारे उपलब्ध करून दिलेले 6000 पेक्षा अधिक प्रश्न तुमच्या अभ्यासात तुमची कशी मदत करतात?

आपल्या चॅनल वरती घेण्यात येणाऱ्या टेस्ट ची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहे :

 1. 6000 पेक्षा अधिक प्रश्न
 2. गणित आणि बुद्धिमत्ता च्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
 3. शुद्धलेखनाच्या आणि टायपिंगच्या चुका विरहित प्रश्न
 4. सोपे वाटणारे परंतु संकल्पना क्लिअर करणारे प्रश्न
 5. सोप्या कडून अवघडाकडे जाणारी टेस्ट ची रचना

या वरील सर्व मुद्द्यांचा विचार करून तुमची प्रतिक्रिया लिहा.

( या पुस्तकाच्या गिफ्ट लकी ड्रॉमध्ये हमखास बक्षीस मिळवून देण्यासाठी एक टीप माझ्याकडून :
मित्रांनो खूप चांगले लिहिण्यापेक्षा तुम्हाला जो अनुभव आला, तुमच्या अभ्यासात जो फायदा झाला तो प्रतिक्रिया मध्ये लिहा, खूप चांगल्या प्रतिक्रिया पेक्षा प्रामाणिक आणि सत्य प्रतिक्रियेला बक्षीस देण्याची जबाबदारी माझी ! )

खालील बटनावर क्लिक करून तुमची प्रतिक्रिया लिहा आणि पुस्तकाच्या लकी ड्रॉमध्ये बक्षीस मिळवा.

7 thoughts on “5000 रू किमतीचे बक्षीस चॅनेलच्या सदस्यांसाठी”

 1. Jay Hind sir ,
  Sir khr sangayc tr ya grup mule maza khup fayda zala aahe karn jewha mi self stdy krt hote tewha mla fkt 40_50 marks bhetayce pn jewha mi ya grup la join zale ani yawril q papr sodwayla surwat zali tewha pasun maza scor hi wadla aaj mla kontihi test dili tr shj 85_90 pdtat khrc mi aabhari aahe karn srwsadharn kutumbatil mi ek mulgi asun mla cllases lawn prwdt nwht aani tyat mla ya grupci mahiti milali aani mi yshacya jwl yeu shkle
  Thanks sir
  Jay hind

 2. Hasan Mujawar

  मी आपली रोजची test नियमितपणे सोडवतो,आणि माझ्या मित्रालाही सोडवायला सांगतो,त्यामुळें दोघांच्या मध्ये टेस्ट सोडवायची चुरस लागून आभ्यास चांगला होतो…आपल्या टेस्ट मध्ये नवंनवीन व परीक्षेनुसार प्रश्नं पाहायला मिळतात जे येणाऱ्या पोलीसभरतीसाठी नक्किच उपयोगी ठरतील.आपण सर्व विद्यार्थ्यांसाठी करत असलेल्या अनमोल कार्यास मि आपणांस शुभेच्छा देतो….

 3. Pujari Sandip Balkrishna

  Congratulations sir tumch 1lakhs members zaly badal. . SIR, Tumi test suru kelya pasun khar sangto bharpur fayda zala aahe mi tumchi 1li test sodvali fakt mala 3 out 15 mark padli Pan sir khar sangto aata pratak test la 10cha varti mark geto out of 15 mag ti test kiti ka avgad aseyna j. Aani Pratik test aadi tumchi aadi sodvato nantar lihun kadto

 4. Jai hind sir
  1) time saving, muddeaadharit prashna patrika.
  2) saglyasathi soyiskar.
  3) dheypraptisathi paripurna , darjedar q p
  4) mahitine paripurna

 5. Mahesh Solanke

  सर तुम्ही या साईट च्या माध्यमातून आम्हा सर्वांना खूप चांगले शिकवीत आहात. तुमचे मनापासून धन्यवाद..

  तुमच्यातला शिक्षक असाच जागा राहो. व महाराष्ट्रातील प्रत्येक मुलाला याचा लाभ मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना…

 6. Hello sar mi eak sis security madhe kam karto maze aai vadil ustodkamgar aslya mule gharci paristiti nazuk aslya mule mala class lavanya sathi mi kam karun
  Class karto class karat astana tumachy
  Testacha mala khup fayda hoto kamavarti test sodnyasathi tumachy yaa telegram saitacha mala duguna fayada hoto
  Mala ji prtikriya mandata aali ti mimandanycha praytn kela
  Aapala satish khade…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!