Marathi Grammar मराठी व्याकरण हा विषय पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देणारा विषय आहे.
मात्र त्यासाठी जास्तीत जास्त तयारी करणे आवश्यक आहे.
कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या सध्या होणाऱ्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर लक्षात येईल की या विषयाचे प्रश्न तर सोपे दिसतात परंतु थोडासा गोंधळ झाल्याने आपले काही प्रश्न चुकतात.
फक्त मराठी सोपे वाटते, प्रश्न सोडवायला सोपे दिसतात म्हणून हा विषय सोपा आहे असा नाही. दिसायला सोपा असणाऱ्या विषयात आपण खालील चुका करतो म्हणून आपले प्रश्न चुकत असतात.
Marathi Grammar चा अभ्यास करताना आपण काय चुका करतो?
- आपण मराठी विषय सोपा आहे म्हणून त्याच्या अभ्यासासाठी खास वेळ देत नाही.
- आपण मराठी व्याकरण विषयाची खास तयारी करत नाही. परीक्षा आली की हे सोपे आहे, हे आपल्याला येते आहे असा विचार करून आपण अभ्यास करणे सोडून देतो.
या कारणांमुळे सोपा वाटणारा विषय आपल्याला परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवून देत नाही. असे होऊ नये म्हणून आपण या विषयाला देखील तितकेच महत्व द्यायला हवे.
आपण या फ्लटफॉर्मच्या माध्यमातून रोज थोडा थोडा वेळ देऊन येणाऱ्या परीक्षेत मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क्स घेण्याचे ध्येय ठेवणार आहोत.
मराठी व्याकरण चा अभ्यास करताना महत्वाच्या चार स्टेप्स
यासाठी आपण खालील स्टेप्स नुसार अभ्यास करणार आहोत.
- पुस्तकातील प्रकरणाचा अभ्यास पूर्ण करणे
- त्या प्रकरणावर आधारित टेस्ट सोडवणे
- पुन्हा सरावासाठी ती टेस्ट pdf स्वरूपात download करून घेणे.
- आणि सर्वात शेवटी काही प्रकरणे मिळून रिविजन टेस्ट सोडवणे.
या चार स्टेप्स नुसार अभ्यास केला तर मला खात्री आहे की मराठी व्याकरण विषयाचा एकही गुण कमी मिळणार नाही.
आणि जर या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळाले तर येणाऱ्या परीक्षेत तुमचे मेरिट लिस्ट मध्ये नक्कीच नाव असेल.
चला तर मग वेळ वाया न घालवता अभ्यासाला सुरुवात करा.