Police Bharti Question Paper 102 1. एका शेताच्या लगतच्या आयातकृती जमिनीचे क्षेत्रफळ 9.6 मीटर वर्ग आहे. जर त्या जमिनीची रुंदी 0.8 मीटर असेल तर लांबी किती मीटर असेल? 1.2 0.12 120 12 2. …. मार्गाने मिळवलेले पैसे टिकतात हा तुझा ….. समज आहे – दोन्ही रिकाम्या जागी एकच उपसर्ग निवडा गैर आड अति राज 3. विशाल अमन पेक्षा 2 वर्षाने मोठा आहे. आणखी 4 वर्षाने अमन आणि विशाल यांच्या वयाचे गुणोत्तर 8:9 होईल. तर त्यांची आजची वये किती? 8 आणि 10 10 आणि 12 12 आणि 14 14 आणि 16 4. गदर पार्टी शी संबंधित नाव खालील पैकी कोणते आहे? लाला लजपतराय लाला हरदयाल मादाम कामा रामप्रसाद बिस्मिल 5. राज्यात एकूण किती महानगरपालिका आहेत? 23 33 31 27 6. अत्युत्तम या शब्दाची योग्य फोड करा अति + युत्तम अती + उत्तम अत्त्यो + त्तम अति + उत्तम 7. एक दुकानदार खरेदीवर एकदा 40% आणि 30% याप्रकारे सूट देतो. तर पूर्ण विचार करता दुकानदाराने खरेदीवर किती % सूट दिली आहे? 58 42 60 48 8. हरित गृह वायुमध्ये कोणता वायू येत नाही? कार्बन डायऑक्साइड सल्फर डायॉक्साईड क्लोरॉफ्लूरो कार्बन मिथेन 9. आज्ञार्थी वाक्य ओळखा वाचायला घेतलेले पुस्तक वेळेत परत करा वाचायला घेतलेले पुस्तक वेळेत परत करणार आहे का? तो वाचायला घेतलेले पुस्तक वेळेत परत करतो वाचायला घेतलेले पुस्तक वेळेत परत करावे 10. रामभाऊ यांच्या मुलीच्या मुलीची आजी ही एका स्त्री ची सून आहे. तर ती स्री रामभाऊ यांची कोण असेल? मुलगी बायको आई पत्नी 11. खालील पैकी कोणते वाक्य रीती वर्तमानकाळाचे आहे? पप्पा मला खूप जीव लावायचे ती न चुकता प्राणायाम करत असते त्यांना माझ्याबद्दल आता सर्व माहीत झाले असेल आई मला प्रेमाने भरवते 12. एका पूर्व – पश्चिम रांगेच्या मध्यभागी उत्तरेकडे तोंड करून रमेश बसला आहे. त्याच्या दोन्ही बाजूचे व्यक्ती त्याच्या विरूध्द दिशेला तोंड करून बसले आहे. तर रमेशच्या डाव्या हाताला बसलेल्या व्यक्तीच्या उजव्या हाताला कोणती दिशा असेल? उत्तर दक्षिण पश्चिम पूर्व 13. खालीलपैकी कोणत्या दोन संख्यांची किंमत सारखी नाही? 3/4 आणि 0.75 1/4 आणि 0.25 2/3 आणि 0.66 1/3 आणि 0.66 14. खालील पैकी कोणत्या शहराला भारतातील नियोजित शहर म्हणून ओळखले जाते? सायबराबाद बेंगळुरू इलेक्ट्रॉनिक सिटी अमरावती 15. सुधीर उत्तरेला 2 किमी चालतो आणि त्यानंतर उजव्या हाताला 4 किमी चालतो. पुन्हा उजव्या हाताला 2 किमी चालतो. आणि शेवटी पुन्हा उजव्या हाताला वळण घेत 8 किमी चालतो. तर आता तो मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला असेल? पश्चिम दक्षिण उत्तर पूर्व Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Anonymous 12/03/2020 at 11:04 am bhartatil niyojit shahar chandigad ahay tumhi amravati mhantay…102 no. Reply
Sagar Sir | SBfied.com 12/03/2020 at 3:05 pm सर भारतात बरेच शहर हे नियोजीत शहर म्हणून ओळखले जातात.फक्त चंडीगड हे एकटेच नियोजित शहर नाही. प्रश्नात दिलेल्या पर्यायांपैकी अमरावती ( आंध्रप्रदेश राजधानी ) हे नियोजित शहर आहे म्हणून तो पर्याय योग्य आहे. Reply
bhartatil niyojit shahar chandigad ahay tumhi amravati mhantay…102 no.
सर भारतात बरेच शहर हे नियोजीत शहर म्हणून ओळखले जातात.फक्त चंडीगड हे एकटेच नियोजित शहर नाही. प्रश्नात दिलेल्या पर्यायांपैकी अमरावती ( आंध्रप्रदेश राजधानी ) हे नियोजित शहर आहे म्हणून तो पर्याय योग्य आहे.