Police Bharti Question Paper 79 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 15/02/2020 1. शिलकीचे अंदाजपत्रक म्हणजे काय? उत्पन्न आणि खर्च दोन्ही सारखेच असतात उत्पन्नाचे प्रमाण खर्चापेक्षा अधिक असते खर्च आणि उत्पन्नात काही संबंध नसतो खर्चाचे प्रमाण उत्पन्नापेक्षा अधिक असते 2. चंद्रकांत घरातील सर्वात उंच व्यक्ती आहे. अविनाश पेक्षा कमी उंचीचे घरात कोणीही नाही. जर घरात एकूण चार व्यक्ती असेल तर चंद्रकांत पेक्षा कमी उंची असणाऱ्या व्यक्तींची संख्या किती असेल? 1 2 3 सांगता येणार नाही 3. मिहान (MIHAN) हा आंतरराष्ट्रीय प्रकल्प खालील पैकी कोठे आहे? नाशिक सिन्नर नागपूर औरंगाबाद 4. जर Z= 26 तर S+T = ?+ Z Q M O N 5. आमची चप्पल दुकान हेच आमच्या उत्पन्नाचे साधन होते. या वाक्यात चप्पल हा शब्द… विशेषण आहे क्रियाविशेषण आहे नाम आहे क्रियापद आहे 6. हेरंब ने एका संख्येला 27 ने भाग देण्याऐवजी 2.7 ने भाग दिला तर त्याच्या मूळ उत्तराच्या किती पट नवे उत्तर येईल? 0.01 0.1 10 100 7. तीन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे व्यक्तिमत्व खालील पैकी कोण आहे? शरद पवार वसंतराव नाईक हे सर्व वसंतदादा पाटील 8. एखादे काम सोप्या पद्धतीने सोडून अवघड पद्धतीने करणे – यासाठी कोणता वाक्यप्रचार वापरला जातो? द्राविडी प्राणायाम करणे आगीतून फुफाट्यात जाणे वाटाण्याच्या अक्षता लावणे हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे 9. साहिल महिन्याच्या पगारातील 1/4 भाग कर्जाचा हफ्ता साठी बाजूला ठेवतो. उर्वरित रकमेचा 1/2 भाग बचत म्हणून बाजूला ठेवतो. तरीही त्याच्याकडे 3000 रुपये उरतात तर त्याचा पगार किती असेल? 8000 12000 6000 10000 10. 42__11__3__9 = 145 हे समीकरण पूर्ण करण्यासाठी चिन्हांचा योग्य क्रम निवडा -+× ×÷- -×+ -÷× 11. 2017 या वर्षी संगणक – इंटरनेट क्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या व्हायरस चे नाव काय आहे? ट्रोजन हॉर्स मॉरिस आय लव्ह यू वॉना क्राय 12. अरोहीच्या भावाचे सासरे अरोहीच्या मामीचे पती आहे. तर अरोहीचा भाऊ अरोहीच्या मामाचा कोण असेल? भाऊ मुलगा भाचा मामेभाऊ 13. लतादीदींचा गायनाचा कार्यक्रम चालू होता पण माझा मित्र तिथे पण झोपी गेला. या साठी कोणती म्हण अनुरूप आहे? कोल्हा काकडीला राजी गाढवाचे नाव गोपळशेठ गाढवाला गुळाची चव काय? नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे 14. सर्वांनी माझ्यामागे प्रार्थना म्हणा – वाक्याचा प्रकार ओळखा स्वार्थी वाक्य संकेतार्थी वाक्य विध्यर्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य 15. एका दागिन्यामध्ये सोने चांदी 3:7 या प्रमाणात आहे. तर दुसऱ्या दागिन्यामध्ये हे प्रमाण 2:8 आहे. जर दोन्ही दागिन्यांचे वजन सारखे असेल तर कोणत्या दागिन्यामध्ये सोन्याचे प्रमाण अधिक असेल? माहिती अपूर्ण आहे पहिल्या दागिन्यामध्ये दुसऱ्या दागिन्यामध्ये दोन्ही मध्ये सारखे असेल. Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Challenging