Marathi Practice Question Paper 95 [ मराठी सराव परीक्षा ] 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/08/2022 1. जाऊ या शब्दाचे अनेकवचनी रूप काय आहे ? जाऊ जावई जावा जाई2. खालीलपैकी कोणता शब्द सोने या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? धव हिरण्य कांचन कनक3. पहाटेच्या वेळी मी गणिताची सूत्रे पाठ करतो किंवा इंग्रजी व्याकरणाचा सराव करतो. – वाक्याचा प्रकार ओळखा. मिश्र वाक्य संयुक्त वाक्य केवलवाक्य प्रश्नार्थक वाक्य4. उपसर्गसाधित शब्द निवडा. वेडसर रसिक फटफजिती शालीन5. ऋतुजा पेन्सिलने चित्र काढते. या वाक्यातील पेन्सिलने या शब्दाला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागला आहे ? चतुर्थी प्रथमा द्वितीया तृतीया6. चुकीचा पर्याय निवडा. माजी × आजी स्मृती × विस्मृती वंद्य × निंद्य सरळ × सोपे7. अनंतरावांनी भल्या मोठ्या खोक्यातून छोटा टी.व्ही घरी आणला म्हणतात ना – पुढे तिखट मागे पोचट बैल गेला नि झोपा केला बोलेल तो करेल काय पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा8. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. नूतनिकरण नुतनीकरण नूतनीकरण नूतनीकरन9. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? तोंडाला पाने पुसणे. तोंड स्वच्छ पुसणे फसवणे पेचात सापडणे कडक शब्दात रागावणे10. मुलाफुलांचे कवी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? न. चि. केळकर ना. वा. केळकर प्रल्हाद केशव अत्रे कृष्णाजी केशव दामले11. खाली दिलेल्या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? चर्पटपंजरी संकुचित वृत्तीचा कळ लावणारा निरर्थक बडबड मंद बुद्धीचा12. चंद्रशेखर – या शब्दाचा समास ओळखा. द्वंद्व अव्ययीभाव बहुव्रीही तत्पुरूष13. चुकीचा पर्याय निवडा. भाषा + अंतर = भाषांतर नर + उत्तम = नरोत्तम मंदा + अंध = मंदांध गंगा + ओघ = गंगौघ14. सकाळच्या वेळी प्राजक्ताची फुले अंगणात पडलेली असतात.- या वाक्यातील उद्देश्य कोणते ? असतात अंगणात फुले सकाळच्या15. योग्य विधान निवडा. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे सहा आहे. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे दोन आहे. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे तीन आहे. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे चार आहे. Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
14
12
11
11
11
11 marks
13/15
7
14mark
14
10/15