Marathi Practice Question Paper 95 [ मराठी सराव परीक्षा ] 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/08/2022 1. ऋतुजा पेन्सिलने चित्र काढते. या वाक्यातील पेन्सिलने या शब्दाला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागला आहे ? प्रथमा तृतीया द्वितीया चतुर्थी2. उपसर्गसाधित शब्द निवडा. फटफजिती रसिक वेडसर शालीन3. चुकीचा पर्याय निवडा. वंद्य × निंद्य माजी × आजी स्मृती × विस्मृती सरळ × सोपे4. पहाटेच्या वेळी मी गणिताची सूत्रे पाठ करतो किंवा इंग्रजी व्याकरणाचा सराव करतो. – वाक्याचा प्रकार ओळखा. मिश्र वाक्य प्रश्नार्थक वाक्य केवलवाक्य संयुक्त वाक्य5. खाली दिलेल्या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? चर्पटपंजरी मंद बुद्धीचा निरर्थक बडबड संकुचित वृत्तीचा कळ लावणारा6. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? तोंडाला पाने पुसणे. कडक शब्दात रागावणे फसवणे तोंड स्वच्छ पुसणे पेचात सापडणे7. योग्य विधान निवडा. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे सहा आहे. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे तीन आहे. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे दोन आहे. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे चार आहे.8. खालीलपैकी कोणता शब्द सोने या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? धव कनक कांचन हिरण्य9. चंद्रशेखर – या शब्दाचा समास ओळखा. द्वंद्व अव्ययीभाव बहुव्रीही तत्पुरूष10. सकाळच्या वेळी प्राजक्ताची फुले अंगणात पडलेली असतात.- या वाक्यातील उद्देश्य कोणते ? सकाळच्या फुले असतात अंगणात11. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. नूतनीकरन नूतनीकरण नूतनिकरण नुतनीकरण12. अनंतरावांनी भल्या मोठ्या खोक्यातून छोटा टी.व्ही घरी आणला म्हणतात ना – पुढे तिखट मागे पोचट पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा बोलेल तो करेल काय बैल गेला नि झोपा केला13. मुलाफुलांचे कवी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? ना. वा. केळकर कृष्णाजी केशव दामले न. चि. केळकर प्रल्हाद केशव अत्रे14. चुकीचा पर्याय निवडा. भाषा + अंतर = भाषांतर मंदा + अंध = मंदांध गंगा + ओघ = गंगौघ नर + उत्तम = नरोत्तम15. जाऊ या शब्दाचे अनेकवचनी रूप काय आहे ? जावा जाई जावई जाऊ Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
14
12
11
11
11
11 marks
13/15
7
14mark
14
10/15