Solapur City Police Bharti Question Paper 2021 – सोलापूर शहर पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/12/2021 1. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो’ या अवतरणातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता? स्वरूपबोधक विकल्पबोधक न्यूनतमबोधक परिणामबोधक2. एका टोपलीत चिकूचे 8 10 किंवा 12 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येकवेळी 4 चिकू उरतात तर टोपलीत कमीत कमी किती चिकू असतील? 124 116 64 1203. चंदाने द.सा.द.शे 8 दराने 8000 रुपये रक्कम 5 वर्षासाठी सरळ व्याजाने घेतली. तर तिला किती सरळव्याज भरावे लागेल? रु 3200 रु 3250 रु 3600 रु 34004. परिक्षेतील यशाने ….. सर्वच आनंदित होतो. मी स्वतः आपण तो5. रोमन लिपीत किती संख्या चिन्ह आहेत? 8 7 9 66. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय अपंग महिला कोण? मेघा सावंत अरुनिमा सिन्हा मानसी सेशू अनामिका सेठी7. एक दागिन्यांचा व्यापारी किमतीवर 20% टक्के सुट देतो तरीही 16% नफा होतो. जर दागिन्याची छापील किंमत रु. 870 असेल तर दागिन्यांची खरी किंमत किती? 750 650 630 6008. भाकरी’ या शब्दासाठी अनेकवचनी शब्द सांगा. भाकरी भाकऱ्या भाकर भाकरे9. 50 ग्रॅम चहाची एक पुडी याप्रमाणे 10 कि.ग्र. चहाच्या किती पुड्या तयार होतात? 400 300 150 20010. एका पिशवीत 20 पैसे 10 पैसे व 5 पैसे यांची नाणी 1:2:3 या प्रमाणात आहेत. जर पिशवीत एकूण 55 रुपये आहेत तर पिशवीत 5 पैशांची नाणी किती? 150 200 100 30011. एका रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या मुलाचा क्रमांक 17 वा आहे. त्या रांगेत एकूण मुले किती असतील? 35 33 34 3612. एका शेतात 20 कोंबड्या 15 गाई व काही गुराखी उभे आहेत. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे .तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील? 8 6 1 513. सप्टेंबर 2021 च्या शेवटच्या आठवड्यात कोणत्या वादळामुळे भारतात फार मोठ्या प्रमाणात पाऊस झाला? हॅरिसन निसर्ग गुलाब तौक्ते14. शत्रूला सामील न झालेला……. देशप्रेमी फितूर एकनिष्ठ फिरंगी15. ताशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती? 162 मीटर 270 मीटर 540 मीटर 280 मीटर16. 0 7 26 63 ? 126 124 80 7417. चष्मा लावलेली मुलगी कॅरम खेळते’ या वाक्यातील उद्देश विस्तार कोणते? चष्मा लावलेली खेळते कॅरम चष्मा18. एक दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज 9 आहे. त्यांच्या अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या मुळ संख्येपेक्षा 27 ने मोठी आहे तर ती मुळ संख्या कोणती? 36 27 63 5419. P Q R S ही चार पुस्तके असून एकावेळी दोन पुस्तके घेता येतात तर अशा किती जोड्या असू शकतात? 3 6 5 420. चूप चूपचाप गुपचुप गप’ ही सर्व कोणत्या प्रकारच्या केवलप्रयोगी अव्ययाची उदाहरणे आहेत? विरोधदर्शक रागदर्शक मौनदर्शक संबोधन21. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. विधान परिषद कधीही बरखास्त होत नाही. विधान परिषद दर तीन वर्षांनी बरखास्त होते विधान परिषद हे कनिष्ठ सभागृह आहे विधान परिषद सदस्यांचा कार्यकाल तीन वर्षाचा असतो22. खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा. डोळे मळे तळे गोळे23. शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. आर्शीवाद अशीर्वाद आशीर्वाद आशिर्वाद24. खालीलपैकी योग्य विधाने निवडा. 1)जी व्ही के राव समिती आरोग्य मंत्रालयाशी संबंधित आहे. 2) जी व्ही के समितीची स्थापना आहे 1985 साली झाली. 3) या समितीने त्यावेळच्या पंचायतराज संस्थेवर मुळाशिवाय रोप अशी टीका केली होती. 4) या समितीने स्थानिक नियोजन व विकासामध्ये पंचायती राज संस्थेला प्रमुख भुमिका देण्याचे नमूद केले 2 3 व 4 1 व 2 3 व 4 1 2 व 425. 5 4 9 13 22 35 ? 6 2 57 58 5526. चुकीचा पर्याय ओळखा. वर्गिस कुरियन – मिल्क मॅन ऑफ इंडिया सुनील गावस्कर – लिटल मास्टर सरोजिनी नायडू – फुलराणी फिरोजशहा मेहता – मुंबईचा सिंह27. माझे नाव गजानन माझ्या मुलीच्या आते बहिणीच्या आईचे नाव मेघना. मेघना चे वडील विठ्ठलपंत. त्यांची बहीण रमाबाई तर रमाबाई माझ्या कोण? आत्या काकू आई मामी28. विसंगत घटक ओळखा मासिक कादंबरी साप्ताहिक पाक्षिक मासिक साप्ताहिक कादंबरी पाक्षिक29. 750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे. तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल? 450 लिटर 550 लिटर 600 लिटर 500 लिटर30. 56 वी घटनादुरुस्ती 1987 नुसार अरुणाचल प्रदेशाला राज्य म्हणुन मान्यता मिळाली मिझोराम हे नवीन राज्य बनले गोव्याला राज्य म्हणुन मान्यता मिळाली सिक्कीम हे भारताचे घटक राज्य बनले31. BC=49 तर CD=? 163 169 916 9432. 2G 3G 4G येथे G म्हणजे काय? ग्राउंड जनरेशन गिगा बाईट गुगल33. श्रीराम’ या शब्दात एकूण किती स्वर आहेत? दोन तीन एक चार34. पूर्णपणे भारतात तयार झालेली कोरोनावरील लस …. ही आहे. कोव्हॅक्सीन कोव्हिशिल्ड बीसीजी स्पुटनिक35. पुढीलपैकी लहान अपूर्णांक कोणता? अपूर्णांक 3/4 अपूर्णांक 7/11 अपूर्णांक 7/9 अपूर्णांक 5/836. A हा B च्या डावीकडे बसला आहे. B हा C च्या डावीकडे बसला आहे. C च्या उजवीकडे D व E बसले आहेत तर E च्या डावीकडे सर्वात शेवटी कोण बसला आहे? C D A B37. एका सांकेतिक लिपीत HAMMER हा शब्द AHMMRE असा लिहिला जातो तर त्या सांकेतिक भाषेत FLOWER हा शब्द कसा लिहिला जाईल? LFOWER OLFREW LFOWRE LFWWRE38. तु माझे ऐकले हे बरे झाले’ वाक्यप्रचार ओळखा. गौण वाक्य प्रधानवाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य39. खालीलपैकी कोणती भिमा नदीची उपनदी नाही? कऱ्हा दारणा निरा पवना40. एका लॉटरीत मिळालेली रु 7200 हे माला शीला आणि नीता यांना अनुक्रमे 2:3:4 या प्रमाणात वाटून घेतल्यास त्यात शीलाचा वाटा किती असेल? रु 1800 रु 1600 रु 2400 रु 320041. √225/√144=? 225/144 1.25 5/3 25/1142. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. जर 5×9=54 7×4=82 तर 9×8=? 63 72 27 4943. योग्य जोड्या जुळवा. अ गट a – पिवळी क्रांती b – निळी क्रांती c – श्वेत क्रांती d – हरितक्रांतीब गट 1 – अन्नधान्य 2 – तेलबिया 3 – दूध उत्पादन 4 – मत्स्य उत्पादन a-2 b-3 c-4 d-1 a-3 b-4 c-2 d-1 a-1 b-4 c-3 d-2 a-2 b-4 c-3 d-144. खालीलपैकी ‘झिरो माईल’ कोठे आहे? भोपाळ दिल्ली मुंबई नागपूर45. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. समिती वात्सल्य रुपेश सैन्य46. एका बॉक्सची लांबी 15 सेमी व रुंदी 12 सेमी व उंची 8 सेमी असेल तर त्याचे घनफळ किती? 1440 घसेंमी 96 घसेंमी 180 घसेंमी 120 घसेंमी47. घड्याळातील तास काटा व मिनीट काटा पुढीलपैकी कोणत्यावेळी काटकोनात असतो. 12.00 3.30 6.00 9.0048. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? 22 18 20 2949. या वेन आकृतीला जुळणारा पर्याय लिहा वाद्य वीना सनई गाव जिल्हा राज्य आशिया भारत पाकिस्तान युरेनस नेपच्यून ज्युपिटर50. कोरोना व्हायरस कोणत्या घटकापासून बनलेला आहे? डीएनए प्लेटलेट आरबीसी आरएनए51. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? 120 95 65 45 30 20 ? 10 20 15 652. सन 1996 ची सुरुवात सोमवारने झाली असेल तर सन 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल? शनिवार गुरुवार रविवार शुक्रवार53. खालील गणिताची किंमत काढा 1.2 x 1.2 + 0.8 x 0.8 + 2.4 x 0.8 3 12 4 154. एका नदीमध्ये पहिल्या दिवशीच्या दुप्पट शिंपले दुसऱ्या दिवशी सापडतात. त्या नदीत सहाव्या दिवशी 384 शिंपले असतील तर पहिल्या दिवशी नदीमध्ये किती शिंपले सापडले असतील? 6 14 18 1255. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल? F K L J56. Z/1 X/9 U/36 Q/100 ? M/196 L/144 M/169 L/22557. मुलांनी शाळेत जावे’ या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्मणी अकर्मक कर्तरी भावे सकर्मक कर्तरी58. 10 महिला रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात तेच काम 20 महिला रोज 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? 8 6 4 1059. एका गेट टुगेदर मधील 10 मित्रांनी एकमेकांशी एकएकदा गळाभेट घेतल्यास किती गळभेटी होतील? 43 99 100 4560. जर x-y= 3 आणि x²+y²=29 असेल तर xy ची किंमत किती? 2 10 0 161. 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची एकूण बेरीज किती? 2550 5000 5050 1010062. संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? अरुणाचल प्रदेश हिमाचल प्रदेश मिझोराम सिक्किम63. एका रस्त्यावरून काही घोडे व तितकेच घोडेस्वार चालत चालले आहेत. काही अंतर कापल्यानंतर त्यापैकी निम्मे घोडेस्वार हे घोड्यावर स्वार झाले तर आता चालणाऱ्या पायांची संख्या 50 झाली तर एकूण घोडे किती? 30 5 20 1064. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते लिहा? 8 9 10 765. पाया 5 सेमी उंची 12 सेमी असणाऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण किती असेल? 10 सेमी 11 सेमी 13 सेमी 17 सेमी66. 15 वी G-20 देशांची शिखर परिषद – 2020 कुठे पार पडली? रोम न्यूयॉर्क कोलंबो रियाध67. एका दोरीचे समान पाच भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल? पाच तीन सहा चार68. खालीलपैकी कोणता विषाणुजन्य आजार नाही? एचआयव्ही डेंग्यू मलेरिया covid 1969. पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा कोणता? बुध चंद्र सूर्य स्कुटी70. आईसारखी आई’ – अलंकार ओळखा. अनन्वय अलंकार दृष्टांत अलंकार श्लेष अलंकार रूपक अलंकार71. तालिबान राजवट येण्याच्या वेळी ….. हे तत्कालीन अफगाण राष्ट्रपती देश सोडून परागंदा झाले. मो. फारुख सालेम मो. मुल्ला आखुनजादा मो. अशरफ घणी मो. हिनायतुल्ला72. मन्वंतर’ – शब्दांची संधी ओळखा. मन्व + अंतर मन + अंतर मन व अंतर मनु + अंतर73. 4466* या संख्येला 8 ने नि:शेष भाग जातो तर * च्या जागी कोणता अंक येईल? 8 0 6 474. मेजवानीसाठी जमलेल्या कुटुंबियांनी दोघात मिळून एक भाताचे भांडे तिघात मिळून एक डाळीचे भांडे पाचात मिळून एक भाजीचे भांडे आणि सहा जणांना मिळून एक श्रीखंडाचे भांडे याप्रमाणे एकूण 108 भांडीत पदार्थ मागवले त्यामुळे कोणताही पदार्थ जास्त झाला नाही व कमीही पडला नाही तर एकूण किती कुटुंबीय मेजवानीला उपस्थित होते? 120 90 60 3075. सागर विजयपेक्षा उंच आहे .अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे .सुजित सागरपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजितपेक्षा उंच आहे. यावरून सर्वात कमी उंची कोणाची असेल? सागर अजित विजय सुजित76. सर्व रस्ते घड्याळ आहेत. सर्व घड्याळ टेबल आहेत तर — सर्व टेबल्स रस्ते आहेत सर्व रस्ते टेबल्स आहेत काही रस्ते टेबल्स नाहीत सर्व रस्ते टेबल्स नाहीत77. A B व C यांच्या आजच्या वयाची बेरीज 77 वर्षे आहे. तर वर्षांपूर्वी तिघांच्या वयाची बेरीज किती असेल? 87 वर्षे 92 वर्षे 62 वर्षे 67 वर्षे78. खालील श्रृंखला पूर्ण करा. a_dcad_c_dd ddac dadc acdd cdda79. 30 चे 12% किती? 4.8 4.5 3.2 3.680. जो येईल तो पाहिल’ वाक्यात कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत? आत्मवाचक दर्शक संबंधी पुरुषवाचक81. शिर्षासन केलेल्या अवस्थेत राहुलचा डावा हात जर पश्चिम दिशा दाखवत असेल तर राहुलचा चेहरा कोणत्या दिशेला आहे? उत्तर दक्षिण यापैकी नाही पूर्व82. 11/200=? 0.005 0.05 0.55 0.05583. एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्षे आहे जर त्यात वर्गशिक्षकाचे वय मिळवले तर त्यांच्या वयाची सरासरी 15 होते तर वर्गशिक्षकाचे वय किती असेल? 33 36 30 3584. गटात न बसणारा पर्याय ओळखा? पी व्ही सिंधू सानिया मिर्झा प्रकाश पदुकोण पी गोपीचंद85. महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते? कमलाबाई किरण बेन कस्तुरबा पुतलीबाई86. अंकमालिका पुर्ण करा. 30 75 36 69 42 63 ? ? 48 57 48 56 48 69 58 6987. मुंबई ब्रिटीशांना कोणाकडून आंदण मिळाले होते? डच मोगल फ्रेंच पोर्तुगीज88. किंमत काढा 1004² 100864 10080016 1016016 100801689. एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग कारवाई करतो? सीबीआय एसीबी केंद्र ईडी90. तीन संख्यांचे गुणोत्तर 3:4:5 आहे त्यांच्या वर्गाची बेरीज 450 असल्यास त्या संख्या कोणत्या? 9 12 15 12 8 2006 6 8 10 9 12 1691. खालीलपैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय नाही? चंद्र ढगामागे लागला खुर्चीखाली पेन आहे कावळा झाडावर बसला पतंग वर उडाला92. 75 वर्षे पुर्ण झाल्यास ….. महोत्सव साजरा करतात. रौप्य सुवर्ण हिरक अमृत93. नारायण श्रीपाद राजहंस’ हे कोणत्या नावाने प्रसिद्ध आहेत? बाल गंधर्व छोटा गंधर्व कवी ग्रेस कुमार गंधर्व94. गटात न बसणारा शब्द ओळखा. कद्रु कासव कमठ कुर्म95. खालीलपैकी एक राष्ट्रपतीचा अधिकार नाही? दरवर्षीच्या संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती आपल्या अभिभाषणाने करतात भारताचे परराष्ट्र करार हे राष्ट्रपतीच्या नावे केले जातात इतर देशात भारतीय राजदुतांची नेमणूक राष्ट्रपती करतात राष्ट्रपती हे मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात96. तोंडावाटे निघणाऱ्या मुलध्वनीला काय म्हणतात? वाक्य स्वर शब्द वर्ण97. पुढीलपैकी कोणता शब्द जोडशब्द नाही? कामधाम कामचुकार कामधंदा कामकाज98. पोत्यातील संत्रा व सफरचंद यांचे प्रमाण 8:5 आहे. जर सफरचंदाची संख्या 160 आहे तर पोत्यातील एकूण फळांची संख्या किती? 260 416 100 25099. …….या भारतीय वंशाच्या महिला उपराष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेमध्ये कार्यरत आहेत. किरण पॉल कमला बेन किरण राव कमला हॅरीस100. स ला ते – एकवचनी प्रत्यय व स ला ना ते – अनेकवचनी प्रत्यय तसेच संप्रदान(दान) हे कारकार्थ कोणत्या विभक्तीत असतात? तृतीया द्वितीया प्रथमा चतुर्थी Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Sagar Sir | SBfied.com 21/12/2021 at 8:15 amसर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका मिळविण्यासाठी खालील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा Police Bharti Reply
सर सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून द्या
सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका मिळविण्यासाठी खालील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा
Police Bharti
Solapur old question paper
All question paper
Sir answer key nahi takali ka?
Good
90
Bhai 8080462316 ha maza nabar ahe mla ganit saga na 2-3
Thanks
Nanded 98 marks
100/41
100/52
89
100/68