Marathi Practice Question Paper 06 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 27 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/09/2024 1. खाली दिलेल्या म्हणीचा अर्थ काय होतो ? अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का ? अतिशय उतावीळपणाचे वर्तन यापैकी नाही कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते. अंगठा सुजून डोंगराएवढा होत नाही.2. पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा? आवश्यक × आवश्यकता उताणा × पालथा अनुभवी × अननुभवी अयाचित × याचित3. अलमटलम हा शब्द ….. शब्द आहे पूर्णभ्यस्त अनुकरणवाचक अंशाभ्यस्त सामासिक4. गुंजारव असतो ………. पंखांचा मुंग्यांचा मधमाश्यांचा मधमाश्यांचा व मुंग्यांचा5. व्यायामाबरोबर त्याचे चिंतनही झाले – या वाक्यात आलेला ‘ ही ‘ हा शब्द … आहे शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय6. सुप्रीम कोर्टाच्या न्यायधिशांनी आपला निर्णय जाहीर केला – या वाक्यातील उद्देश ओळखा निर्णय न्यायधिश सुप्रीम कोर्टाचा न्यायधिश कोर्टाचा न्यायधिश7. आडवातिडवा हा ……………. शब्द आहे. उपसर्गघटित पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त अनुकरणवाचक8. अकर्मक कर्तरी प्रयोगाचे लक्षण खालीलपैकी कोणते नाही ? क्रियापद कर्त्याच्या लिंगानुसार बदलते. क्रियापद कर्त्याच्या वचनानुसार बदलते. वाक्यात कर्म असते. यापैकी नाही.9. निशानाथ शब्दाचा समानार्थी शब्द निवडा सूर्य भुंगा चंद्र भूत10. खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. सकट स्थलवाचक साहचर्यवाचक संबंध वाचक हेतुवाचक11. चरण संख्या अक्षर गण असे कोणतेच बंधन नसते. ही ओळख …. ची आहे मुक्तछंद अक्षरगणवृत्त मुक्तहस्त छंदवृत्त12. शब्दयोगी अव्ययाचा प्रकार सांगा – निर्णयासाठी तिला वेळ हवा आहे. योग्यतावाचक कैवल्यवाचक व्यतिरेकवाचक हेतूवाचक13. केळी हा शब्द कोणत्या वचनात आहे? अनेकवचन एकही नाही एकवचन दोन्हीही14. वेगळा पर्याय निवडा अप्रूप वाटणे कौतुक वाटणे अक्षता वाटणे आश्चर्य वाटणे15. देशभक्तीपर चित्रपट पाहिल्यावर मनात देशाविषयी अभिमान निर्माण होतो – या वाक्यातील ‘मन’ या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? द्वितीया तृतीया सप्तमी प्रथमा16. अत्युत्तम या शब्दाची संधी सोडवा. अती + युत्तम अतु + उत्तम अत + युत्तम अति + उत्तम17. 1. निर्णय द्यायचा आहे 2. मला 3. ऐकून 4.सर्वांचे मत – अर्थपूर्ण वाक्य तयार होण्यासाठी कोणता क्रम असायला हवा ? 2431 1432 1423 241318. आम्ही चारचाकी खरेदी केली या वाक्यातून कोणता अर्थ व्यक्त होतो? वाच्यार्थ लक्ष्यार्थ व्यंगार्थ यापैकी नाही.19. घरात दररोज फिरून त्याच मुद्द्यावर भांडण होते – क्रिया विशेषण ओळखा फक्त दररोज फक्त फिरून दररोज आणि फिरून एकही नाही20. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन ‘ए’ कारान्त होत नाही ? पंखा पान दांडा चुक21. शब्दाचा समास प्रकार ओळखा – दरवेळी तत्पुरुष द्वंद्व बहूव्रीही अव्ययीभाव22. बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात – या वाक्याचा प्रकार ओळखा. मिश्र वाक्य संयुक्त वाक्य केवलवाक्य यापैकी नाही23. दोन्ही पदे महत्वाचे असणारा समास कोणता आहे? तत्पुरूष बहुव्रीही अव्ययीभाव द्वंद्व24. अर्धा किलो जिलेबी घेऊन भिवा आपल्या लाडक्या लेकीकडे गेला. या वाक्यातील संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा पूर्णांकवाचक अपूर्णांकवाचक साकल्यवाचक क्रमवाचक25. हेत्वाभास या शब्दाची संधी कशी सोडवाल ? हेतु + अभास हेतु + भास हेत्वु + आभास हेतु + आभास26. गवताचा ….. भारा जुडी पेंढी थप्पी27. पुढीलपैकी कोणते उदाहरण ‘पूर्वरूप संधीचे’ आहे? चांगलेसे हातून भरडून नुमजे28. आदेश मिळताच सर्व आरोग्य कर्मचारी कामावर रजू झाले – अशुद्ध शब्द ओळखा आरोग्य आदेश रजू कर्मचारी29. खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. मोर केकावली घुत्कार कलरव आरवणे30. खालील चारपैकी एक शब्द प्रत्ययघटित आहे तो ओळखा प्रतिबिंब अनुरूप सावकारी अव्यय31. पूर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणते? मी मृत्यूंजय कादंबरी वाचली. मी मृत्यूंजय कादंबरी वाचतो. मी मृत्यूंजय कादंबरी वाचलेली आहे. मी मृत्यूंजय कादंबरी वाचणार.32. सर्व फुलांचे दहादहाचे गुच्छ केले – या वाक्यात ‘दहादहाचे’ हा शब्द संख्याविशेषणाचा कोणता प्रकार आहे पृथकत्त्ववाचक गणनावाचक अनिश्चित क्रमवाचक33. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. केलेला उपकार विसरून निषेधार्थ टाळी वाजवणे. उपकार कर्त्या वरतीच उलटणे. उपकार कर्त्याच्या उपकाराची जाणीव ठेवून त्याचे गुणगान करणे. उपकार करण्यासाठी टाळी वाजवणे34. नाम विशेषण धातू व अव्यय अशा विविध जातीच्या शब्दांना प्रत्यय जोडून तयार होणाऱ्या क्रियापदांना काय म्हणतात? साधित क्रियापद अकर्मक क्रियापद सकर्मक क्रियापद संयुक्त क्रियापद35. खालील शब्दाचे सामान्यरूप कसे असेल? बी बीचा आणि बी बिया बी बियांचा आणि बीचा36. ध् श् स् या वर्णाना खालील पैकी कोणत्या गटात टाकता येईल? अल्पप्राण अर्धस्वर महाप्राण उष्मे37. पिकलेल्या आंब्यांची——-पाहून तोंडाला पाणी सुटले – रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा गाथण चवड अढी चळत38. खालीलपैकी कोणत्या शब्दातील डा हा अंत्यवर्ण तिरस्कारसूचक नाही ? वाडा थेरडा घाणेरडा खोटारडा39. तुरूतुरू लखलख गारगार बडबड हे शब्द अभ्यस्त शब्दाचा कोणता प्रकार आहे? अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त यापैकी एकही नाही40. पर्यायातून योग्य शब्द निवडा आणि खाली दिलेले वाक्य पूर्ण करा.मी तुमची काहीच मदत करू शकत नाही याची मला ………. वाटते. मजा चेष्टा आवड खंत41. मराठीतील पहिली सामाजिक कांदबरी ……….. ही आहे. यमुनापर्यटन अमृतवेल फकिरा वळवाचं पाणी42. माझ्यापुरता चहा कर या वाक्यात वापरल्या गेलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा परिमाणवाचक पुर्णतावाचक हेतुवाचक संबंधवाचक43. गर्दी पोलिसांकडून हटविण्यात आली – प्रयोग ओळखा भावे प्रयोग कर्तरी प्रयोग पुराण कर्मणी प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग44. चहाऐवजी दूध दिले तरी चालेल – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणत्या प्रकारचे आहे? विरोधवाचक दिक् वाचक परिणामवाचक विनिमयवाचक45. कथा लिहिताना त्याने नायकासाठी भारदस्त विशेषण वापरले. या वाक्यात आलेला विशेषण हा शब्द काय आहे? क्रियापद नाम विशेषण सर्वनाम46. द्वितीय हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? @ आवृत्तिवाचक अनिश्चित संख्यावाचक क्रमवाचक गुणविशेषण47. मैत्री सेट परीक्षा उत्तीर्ण झाली – यातील ‘मैत्री’ या नामाचा प्रकार ओळखा विशेषनाम भाववाचक नाम सामान्य नाम पदार्थवाचक नाम48. 1) कल असणे 2) भर असणे – हा अर्थ असणारा वाक् प्रचार निवडा कच्छपी लागणे अंगाला होणे कटाक्ष असणे हेवा वाटणे49. वाचत आहे हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे ? उभयविध क्रियापद द्विकर्मक क्रियापद संयुक्त क्रियापद यापैकी नाही50. वर्णमालेत एकूण स्पर्श व्यंजने किती आहेत ? 48 36 34 25 Loading …Question 1 of 50
39
41
33
45/50
41
37
35
34
41
37
33
41
38
44
33
35
Lay bhari sir
42
42
Vitthal
47
38
44
45
40
48
33