Marathi Practice Question Paper 09 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 38 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/10/2024 1. वाक्यात एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो तेव्हा तो कोणता अलंकार असतो? श्लेष अलंकार अनुप्रास अलंकार उपमा अलंकार यमक अलंकार2. टोळभैरव’ या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे? कामात नासाडी करणारे लोक सरळ मार्गाने जाणारे लोक दुसऱ्याच्या तंत्राने चालणारे लोक कामात मदत करणारे लोक3. खच या शब्दाचा समानार्थी शब्द काय ? ढीग दिलेले सर्व गंज रास4. बेडूक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तयार करा बेडकीन बेडकी बेंडुक बेडूक5. तोंडसुख घेणे या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो? मनसोक्त खाणे जिभेचे चोचले पुरविणे चव घेणे खरडपट्टी काढणे6. रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत या म्हणीचा अर्थ काय होतो ? एकाला दुसरा वरचढ भेटणे. कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळ टिकतो. मुख्य गोष्टीचा अभाव असणे. मोठ्या माणसाचा आश्रय प्रभावी असतो.7. रिकाम्या जागेसाठी योग्य शब्दाची निवड करा. तेथे चार पाच मोठे………..पडलेले आहे. दगड यापैकी नाही. दगुड दगडे8. मराठीतील पहिले नियतकालिक कोणते आहे? काव्यफुले केसरी काळ दर्पण9. पुरणपोळी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? द्वंद्व तत्पुरुष अव्ययीभाव बहूव्रीही10. वाग्विहार या शब्दाची संधी कशी सोडवाल? वा: + विहार वागव + हार वाग् + विहार वाक् + विहार11. खालीलपैकी कोणता पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकार नाही? तृतीय द्वितीय चतुर्थ प्रथम12. दिलेल्या पर्यायातील स्वर संधी असणारा पर्याय निवडा. सदाचार गुरूपदेश सन्मती वाक्पती13. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी खूपच कमी पाऊस आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? प्रश्नार्थी वाक्य संयुक्त वाक्य साधे वाक्य उद्गारार्थी वाक्य14. पुढील वर्णापैकी कोणता वर्ण स्वतंत्र उभ्या दंडाला जोडलेला वर्ण आहे? ग क ह उ15. लिंबे हा शब्द कोणत्या शब्दाचे अनेकवचन आहे? निंबू लिंबे लिंब लिंबू16. पूजा या शब्दाचे अनेकवचन कसे होईल? पूजा पूजे पुजा पुजे17. कोणता शब्द शुद्ध आहे? सय्यम सन्यम सयमं संयम18. लोटा या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? लोटी लोट्या लोटस लोटा19. पृथ्वीचा उपग्रह चंद्र पृथ्वीभोवती फिरतो – या वाक्याचा काळ ओळखा रीतिकाळ भविष्यकाळ भूतकाळ वर्तमान काळ20. खालीलपैकी कोणता शब्द सोने या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? कांचन कनक हिरण्य धव21. ब्राम्हण या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. विप्र शुक धव अच्युत22. फक्त 40 सैनिकांच्या तुकडीने हजार शत्रूंचा सामना केला – या वाक्यात कोणता वाक् प्रचार वापरला तरी वाक्याचा अर्थ बदलणार नाही? नाकी नऊ आणले तोंड दिले पाठलाग केला धास्ती घेतली23. पुढील नामाचा प्रकार ओळखा. गुलामगिरी सामान्य नाम भाववाचक नाम विशेष नाम सर्वनाम24. दुरात्मा या शब्दाची संधी विग्रह कसा होईल? दूर + आत्मा दु: + आत्मा दू: + आत्मा दि: + आत्मा25. मोकळी हवा भेटावी म्हणून अरुण संध्याकाळी बाहेर पडला – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा उद्देशबोधक संकेतबोधक स्वरूपबोधक कारणबोधक26. पुढीलपैकी विध्यर्थी वाक्य ओळखा तो खूप घाबरला आईने मुलाला मार दिला आम्हाला परीक्षेत चांगले गुण मिळावेत मुलांनो टीव्ही बंद करा27. अक्कल मस्ती हुशारी मस्करी डावपेच हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे. तेलगू कोकणी फारसी कानडी28. घरी ….. आल्यावर बरे वाटेल जेवून जेवुन जेउन जेऊन29. मलूल शब्दाच्या विरूद्ध अर्थ दाखवणारा शब्द निवडा नाजूक जलील सलील ताजेतवाने30. आत्ता तुम्ही घरात या. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? संयुक्त वाक्य वरीलपैकी नाही केवल वाक्य गौण वाक्य31. देवमाणूस – या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? सज्जन मनुष्य ईश्वर संत मनुष्य32. सुंभ जळाला तरी पीळ जात नाही – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा सत्याचा विजय झाल्यावाचून राहत नाही मनुष्याचा मूळ स्वभाव बदलत नाही एखादी गोष्ट चिरकाल टिकत नाही वैभव गेले तरी अभिमान जात नाही33. उडणारा पतंग सर्वांचे लक्ष वेधून घेत होता – या वाक्यातील ‘ उडणारा ‘ हा शब्द …. आहे धातू नाम क्रियापद धातुसाधित34. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? महत्वकांशी मृत्युंजय वानरकीवन स्वकष्टार्जीत35. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास आणि स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास—या चिन्हाचा वापर करतात संयोगचिन्ह स्पष्टीकरण चिन्ह विकल्प चिन्ह अवतरण चिन्ह36. अलंकार ओळखा. ही दोरी आहे की साप ? दृष्टांत ससंदेह यमक व्याजस्तुती37. खालील वाक्याचे संयुक्त वाक्यात रूपांतर करा पुस्तकाचे पाने फाडून रघुने विमान बनवले दोन्ही योग्य रघुने पुस्तकाचे पाणी फाडले आणि विमान बनवले विमान बनवण्यासाठी रघुने पुस्तकाचे पाने फाडले दोन्ही अयोग्य38. ध्वनीच्या खुणेला …. असे म्हणतात अक्षर वर्ण व्यंजन स्वर39. पाऊस केव्हा पडला ? – ‘ केव्हा ‘ हा शब्द …. आहे शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय40. हा कोरियोग्राफर सगळ्या हीरोंना नाचवितो – क्रियापद प्रकार ओळखा सिद्ध संयुक्त सहायक प्रयोजक41. माझे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. – या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. पुल्लिंग नपुंसक लिंग यापैकी नाही स्त्रीलिंग42. प्रकाश जेवताना बोलत नसे – वाक्याचा काळ ओळखा रीति भूतकाळ यापैकी नाही रीति भविष्यकाळ रीति वर्तमानकाळ43. कोणत्या विभक्तीचे एकवचन आणि अनेकवचन यांचे प्रत्यय समान आहेत संबोधन द्वितीया तृतीया पंचमी44. शेतकरी सर्व जगाचा पोशिंदा आहे – या ‘शेतकरी’ शब्दाचा समास कोणता? उपपद तत्पुरुष समास कर्मधारय समास नत्र तत्पुरुष समास विभक्ती तत्पुरुष समास45. पुस्तकांचा गठ्ठा असतो त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिकेचा……….असतो. संच पुडके गठ्ठा ढीग46. आज शाळेला सुट्टी मिळावी – या वाक्यातून क्रियापदाचा कोणता अर्थ व्यक्त होतो? आज्ञार्थ संकेतार्थ स्वार्थ विध्यर्थ47. केरकचरा या सामासिक शब्दात कोणता समास आहे ? वैकल्पिक द्वंद्व इतरेतर द्वंद्व समाहार द्वंद्व यापैकी नाही48. भाववाचक नाम ओळखा. पीठ नम्रता पुस्तक दूध49. अंशाभ्यस्त शब्द निवडा. लगबग घणघण मऊमऊ कडकडाट50. कंजूष’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? उद्धट अनवधानी संकुचित उधळ्या Loading …Question 1 of 50
39/50
1 mistek
41
49
38
wow yaar nice You so good
Send me books name u refares
40
36
50/25
41
45
35
Nice question
✨
47
45/50
39/50
46
Nice question
47
43/50
Don question nith n vachlya mule chukle
41
I m hindi medium student bt I scored 38/50
Nice question
41
41
44
46
Hi
42
45/50
rohiniburade718gmail.com
35
nice question paper
50/38
44/50
yash
47.50
33