Marathi Practice Question Paper 09 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 38 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/10/2024 1. केरकचरा या सामासिक शब्दात कोणता समास आहे ? इतरेतर द्वंद्व समाहार द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व यापैकी नाही2. कोणता शब्द शुद्ध आहे? संयम सयमं सय्यम सन्यम3. आज शाळेला सुट्टी मिळावी – या वाक्यातून क्रियापदाचा कोणता अर्थ व्यक्त होतो? स्वार्थ संकेतार्थ आज्ञार्थ विध्यर्थ4. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? महत्वकांशी वानरकीवन मृत्युंजय स्वकष्टार्जीत5. वाग्विहार या शब्दाची संधी कशी सोडवाल? वा: + विहार वाक् + विहार वागव + हार वाग् + विहार6. अक्कल मस्ती हुशारी मस्करी डावपेच हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे. कानडी तेलगू फारसी कोकणी7. मोकळी हवा भेटावी म्हणून अरुण संध्याकाळी बाहेर पडला – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा उद्देशबोधक कारणबोधक संकेतबोधक स्वरूपबोधक8. खालीलपैकी कोणता शब्द सोने या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? हिरण्य कांचन कनक धव9. मराठीतील पहिले नियतकालिक कोणते आहे? काव्यफुले केसरी काळ दर्पण10. लिंबे हा शब्द कोणत्या शब्दाचे अनेकवचन आहे? लिंबू लिंब निंबू लिंबे11. आत्ता तुम्ही घरात या. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? केवल वाक्य गौण वाक्य संयुक्त वाक्य वरीलपैकी नाही12. घरी ….. आल्यावर बरे वाटेल जेऊन जेवुन जेवून जेउन13. अलंकार ओळखा. ही दोरी आहे की साप ? व्याजस्तुती यमक ससंदेह दृष्टांत14. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी खूपच कमी पाऊस आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? संयुक्त वाक्य प्रश्नार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य साधे वाक्य15. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास आणि स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास—या चिन्हाचा वापर करतात विकल्प चिन्ह अवतरण चिन्ह स्पष्टीकरण चिन्ह संयोगचिन्ह16. उडणारा पतंग सर्वांचे लक्ष वेधून घेत होता – या वाक्यातील ‘ उडणारा ‘ हा शब्द …. आहे धातुसाधित नाम क्रियापद धातू17. पृथ्वीचा उपग्रह चंद्र पृथ्वीभोवती फिरतो – या वाक्याचा काळ ओळखा रीतिकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ भूतकाळ18. वाक्यात एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो तेव्हा तो कोणता अलंकार असतो? श्लेष अलंकार यमक अलंकार अनुप्रास अलंकार उपमा अलंकार19. देवमाणूस – या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? मनुष्य संत ईश्वर सज्जन मनुष्य20. पुरणपोळी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? बहूव्रीही तत्पुरुष द्वंद्व अव्ययीभाव21. कंजूष’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? संकुचित उधळ्या उद्धट अनवधानी22. प्रकाश जेवताना बोलत नसे – वाक्याचा काळ ओळखा रीति भविष्यकाळ रीति वर्तमानकाळ रीति भूतकाळ यापैकी नाही23. कोणत्या विभक्तीचे एकवचन आणि अनेकवचन यांचे प्रत्यय समान आहेत संबोधन तृतीया द्वितीया पंचमी24. सुंभ जळाला तरी पीळ जात नाही – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा सत्याचा विजय झाल्यावाचून राहत नाही एखादी गोष्ट चिरकाल टिकत नाही मनुष्याचा मूळ स्वभाव बदलत नाही वैभव गेले तरी अभिमान जात नाही25. शेतकरी सर्व जगाचा पोशिंदा आहे – या ‘शेतकरी’ शब्दाचा समास कोणता? विभक्ती तत्पुरुष समास उपपद तत्पुरुष समास कर्मधारय समास नत्र तत्पुरुष समास26. खच या शब्दाचा समानार्थी शब्द काय ? दिलेले सर्व गंज ढीग रास27. बेडूक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तयार करा बेंडुक बेडकी बेडकीन बेडूक28. पूजा या शब्दाचे अनेकवचन कसे होईल? पूजे पूजा पुजा पुजे29. भाववाचक नाम ओळखा. पुस्तक दूध नम्रता पीठ30. मलूल शब्दाच्या विरूद्ध अर्थ दाखवणारा शब्द निवडा सलील नाजूक जलील ताजेतवाने31. ध्वनीच्या खुणेला …. असे म्हणतात व्यंजन वर्ण अक्षर स्वर32. पुस्तकांचा गठ्ठा असतो त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिकेचा……….असतो. ढीग पुडके गठ्ठा संच33. पुढील वर्णापैकी कोणता वर्ण स्वतंत्र उभ्या दंडाला जोडलेला वर्ण आहे? उ ग क ह34. तोंडसुख घेणे या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो? जिभेचे चोचले पुरविणे खरडपट्टी काढणे चव घेणे मनसोक्त खाणे35. हा कोरियोग्राफर सगळ्या हीरोंना नाचवितो – क्रियापद प्रकार ओळखा सिद्ध संयुक्त प्रयोजक सहायक36. अंशाभ्यस्त शब्द निवडा. लगबग घणघण मऊमऊ कडकडाट37. खालीलपैकी कोणता पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकार नाही? प्रथम तृतीय चतुर्थ द्वितीय38. माझे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. – या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. यापैकी नाही पुल्लिंग नपुंसक लिंग स्त्रीलिंग39. पुढील नामाचा प्रकार ओळखा. गुलामगिरी सामान्य नाम भाववाचक नाम सर्वनाम विशेष नाम40. रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत या म्हणीचा अर्थ काय होतो ? मोठ्या माणसाचा आश्रय प्रभावी असतो. कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळ टिकतो. मुख्य गोष्टीचा अभाव असणे. एकाला दुसरा वरचढ भेटणे.41. ब्राम्हण या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. धव शुक अच्युत विप्र42. पुढीलपैकी विध्यर्थी वाक्य ओळखा आम्हाला परीक्षेत चांगले गुण मिळावेत तो खूप घाबरला आईने मुलाला मार दिला मुलांनो टीव्ही बंद करा43. दुरात्मा या शब्दाची संधी विग्रह कसा होईल? दू: + आत्मा दु: + आत्मा दूर + आत्मा दि: + आत्मा44. पाऊस केव्हा पडला ? – ‘ केव्हा ‘ हा शब्द …. आहे उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय45. रिकाम्या जागेसाठी योग्य शब्दाची निवड करा. तेथे चार पाच मोठे………..पडलेले आहे. दगुड दगडे यापैकी नाही. दगड46. दिलेल्या पर्यायातील स्वर संधी असणारा पर्याय निवडा. वाक्पती सन्मती गुरूपदेश सदाचार47. लोटा या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? लोट्या लोटी लोटा लोटस48. फक्त 40 सैनिकांच्या तुकडीने हजार शत्रूंचा सामना केला – या वाक्यात कोणता वाक् प्रचार वापरला तरी वाक्याचा अर्थ बदलणार नाही? धास्ती घेतली नाकी नऊ आणले तोंड दिले पाठलाग केला49. टोळभैरव’ या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे? सरळ मार्गाने जाणारे लोक कामात मदत करणारे लोक कामात नासाडी करणारे लोक दुसऱ्याच्या तंत्राने चालणारे लोक50. खालील वाक्याचे संयुक्त वाक्यात रूपांतर करा पुस्तकाचे पाने फाडून रघुने विमान बनवले दोन्ही योग्य रघुने पुस्तकाचे पाणी फाडले आणि विमान बनवले विमान बनवण्यासाठी रघुने पुस्तकाचे पाने फाडले दोन्ही अयोग्य Loading …Question 1 of 50
39/50
1 mistek
41
49
38
wow yaar nice You so good
Send me books name u refares
40
36
50/25
41
45
35
Nice question
✨
47
45/50
39/50
46
Nice question
47
43/50
Don question nith n vachlya mule chukle
41
I m hindi medium student bt I scored 38/50
Nice question
41
41
44
46
Hi
42
45/50
rohiniburade718gmail.com
35
nice question paper
50/38
44/50
yash
47.50
33