Marathi Practice Question Paper 09 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 38 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/10/2024 1. कोणता शब्द शुद्ध आहे? सय्यम सयमं संयम सन्यम2. पुस्तकांचा गठ्ठा असतो त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिकेचा……….असतो. पुडके ढीग गठ्ठा संच3. मोकळी हवा भेटावी म्हणून अरुण संध्याकाळी बाहेर पडला – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा संकेतबोधक कारणबोधक स्वरूपबोधक उद्देशबोधक4. बेडूक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तयार करा बेडकीन बेंडुक बेडकी बेडूक5. लोटा या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? लोटा लोट्या लोटस लोटी6. लिंबे हा शब्द कोणत्या शब्दाचे अनेकवचन आहे? लिंबू लिंबे लिंब निंबू7. पुरणपोळी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? अव्ययीभाव बहूव्रीही तत्पुरुष द्वंद्व8. ध्वनीच्या खुणेला …. असे म्हणतात व्यंजन स्वर अक्षर वर्ण9. अलंकार ओळखा. ही दोरी आहे की साप ? यमक दृष्टांत ससंदेह व्याजस्तुती10. शेतकरी सर्व जगाचा पोशिंदा आहे – या ‘शेतकरी’ शब्दाचा समास कोणता? नत्र तत्पुरुष समास कर्मधारय समास उपपद तत्पुरुष समास विभक्ती तत्पुरुष समास11. पुढीलपैकी विध्यर्थी वाक्य ओळखा आम्हाला परीक्षेत चांगले गुण मिळावेत आईने मुलाला मार दिला तो खूप घाबरला मुलांनो टीव्ही बंद करा12. कंजूष’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? उधळ्या उद्धट संकुचित अनवधानी13. आज शाळेला सुट्टी मिळावी – या वाक्यातून क्रियापदाचा कोणता अर्थ व्यक्त होतो? आज्ञार्थ स्वार्थ विध्यर्थ संकेतार्थ14. मलूल शब्दाच्या विरूद्ध अर्थ दाखवणारा शब्द निवडा नाजूक ताजेतवाने जलील सलील15. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? मृत्युंजय स्वकष्टार्जीत महत्वकांशी वानरकीवन16. आत्ता तुम्ही घरात या. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? संयुक्त वाक्य केवल वाक्य गौण वाक्य वरीलपैकी नाही17. ब्राम्हण या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. धव अच्युत विप्र शुक18. प्रकाश जेवताना बोलत नसे – वाक्याचा काळ ओळखा रीति भूतकाळ यापैकी नाही रीति वर्तमानकाळ रीति भविष्यकाळ19. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी खूपच कमी पाऊस आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? प्रश्नार्थी वाक्य साधे वाक्य उद्गारार्थी वाक्य संयुक्त वाक्य20. वाक्यात एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो तेव्हा तो कोणता अलंकार असतो? अनुप्रास अलंकार उपमा अलंकार यमक अलंकार श्लेष अलंकार21. रिकाम्या जागेसाठी योग्य शब्दाची निवड करा. तेथे चार पाच मोठे………..पडलेले आहे. दगडे दगड यापैकी नाही. दगुड22. पूजा या शब्दाचे अनेकवचन कसे होईल? पूजा पुजा पूजे पुजे23. खालील वाक्याचे संयुक्त वाक्यात रूपांतर करा पुस्तकाचे पाने फाडून रघुने विमान बनवले दोन्ही अयोग्य विमान बनवण्यासाठी रघुने पुस्तकाचे पाने फाडले दोन्ही योग्य रघुने पुस्तकाचे पाणी फाडले आणि विमान बनवले24. तोंडसुख घेणे या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो? मनसोक्त खाणे जिभेचे चोचले पुरविणे खरडपट्टी काढणे चव घेणे25. भाववाचक नाम ओळखा. पीठ दूध नम्रता पुस्तक26. मराठीतील पहिले नियतकालिक कोणते आहे? दर्पण काळ काव्यफुले केसरी27. अंशाभ्यस्त शब्द निवडा. मऊमऊ लगबग घणघण कडकडाट28. केरकचरा या सामासिक शब्दात कोणता समास आहे ? इतरेतर द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व यापैकी नाही समाहार द्वंद्व29. टोळभैरव’ या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे? कामात मदत करणारे लोक सरळ मार्गाने जाणारे लोक कामात नासाडी करणारे लोक दुसऱ्याच्या तंत्राने चालणारे लोक30. रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत या म्हणीचा अर्थ काय होतो ? एकाला दुसरा वरचढ भेटणे. मोठ्या माणसाचा आश्रय प्रभावी असतो. कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळ टिकतो. मुख्य गोष्टीचा अभाव असणे.31. उडणारा पतंग सर्वांचे लक्ष वेधून घेत होता – या वाक्यातील ‘ उडणारा ‘ हा शब्द …. आहे क्रियापद धातू धातुसाधित नाम32. पुढील नामाचा प्रकार ओळखा. गुलामगिरी विशेष नाम सर्वनाम भाववाचक नाम सामान्य नाम33. खालीलपैकी कोणता पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकार नाही? तृतीय द्वितीय चतुर्थ प्रथम34. सुंभ जळाला तरी पीळ जात नाही – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा एखादी गोष्ट चिरकाल टिकत नाही वैभव गेले तरी अभिमान जात नाही सत्याचा विजय झाल्यावाचून राहत नाही मनुष्याचा मूळ स्वभाव बदलत नाही35. पाऊस केव्हा पडला ? – ‘ केव्हा ‘ हा शब्द …. आहे क्रियाविशेषण अव्यय केवलप्रयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय36. घरी ….. आल्यावर बरे वाटेल जेऊन जेवून जेवुन जेउन37. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास आणि स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास—या चिन्हाचा वापर करतात विकल्प चिन्ह संयोगचिन्ह स्पष्टीकरण चिन्ह अवतरण चिन्ह38. फक्त 40 सैनिकांच्या तुकडीने हजार शत्रूंचा सामना केला – या वाक्यात कोणता वाक् प्रचार वापरला तरी वाक्याचा अर्थ बदलणार नाही? पाठलाग केला तोंड दिले धास्ती घेतली नाकी नऊ आणले39. पुढील वर्णापैकी कोणता वर्ण स्वतंत्र उभ्या दंडाला जोडलेला वर्ण आहे? क ह ग उ40. अक्कल मस्ती हुशारी मस्करी डावपेच हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे. तेलगू कोकणी कानडी फारसी41. खच या शब्दाचा समानार्थी शब्द काय ? रास गंज ढीग दिलेले सर्व42. वाग्विहार या शब्दाची संधी कशी सोडवाल? वाग् + विहार वा: + विहार वागव + हार वाक् + विहार43. देवमाणूस – या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? संत ईश्वर सज्जन मनुष्य मनुष्य44. हा कोरियोग्राफर सगळ्या हीरोंना नाचवितो – क्रियापद प्रकार ओळखा संयुक्त सिद्ध प्रयोजक सहायक45. दुरात्मा या शब्दाची संधी विग्रह कसा होईल? दूर + आत्मा दू: + आत्मा दि: + आत्मा दु: + आत्मा46. माझे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. – या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. स्त्रीलिंग पुल्लिंग नपुंसक लिंग यापैकी नाही47. कोणत्या विभक्तीचे एकवचन आणि अनेकवचन यांचे प्रत्यय समान आहेत संबोधन तृतीया द्वितीया पंचमी48. खालीलपैकी कोणता शब्द सोने या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? धव कनक कांचन हिरण्य49. पृथ्वीचा उपग्रह चंद्र पृथ्वीभोवती फिरतो – या वाक्याचा काळ ओळखा भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ रीतिकाळ50. दिलेल्या पर्यायातील स्वर संधी असणारा पर्याय निवडा. सदाचार सन्मती गुरूपदेश वाक्पती Loading …Question 1 of 50
39/50
1 mistek
41
49
38
wow yaar nice You so good
Send me books name u refares
40
36
50/25
41
45
35
Nice question
✨
47
45/50
39/50
46
Nice question
47
43/50
Don question nith n vachlya mule chukle
41
I m hindi medium student bt I scored 38/50
Nice question
41
41
44
46
Hi
42
45/50
rohiniburade718gmail.com
35
nice question paper
50/38
44/50
yash
47.50
33