Marathi Practice Question Paper 09 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 38 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/10/2024 1. पुढीलपैकी विध्यर्थी वाक्य ओळखा मुलांनो टीव्ही बंद करा आईने मुलाला मार दिला आम्हाला परीक्षेत चांगले गुण मिळावेत तो खूप घाबरला2. अलंकार ओळखा. ही दोरी आहे की साप ? व्याजस्तुती दृष्टांत यमक ससंदेह3. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी खूपच कमी पाऊस आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? उद्गारार्थी वाक्य साधे वाक्य संयुक्त वाक्य प्रश्नार्थी वाक्य4. तोंडसुख घेणे या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो? जिभेचे चोचले पुरविणे मनसोक्त खाणे चव घेणे खरडपट्टी काढणे5. मलूल शब्दाच्या विरूद्ध अर्थ दाखवणारा शब्द निवडा नाजूक सलील ताजेतवाने जलील6. आज शाळेला सुट्टी मिळावी – या वाक्यातून क्रियापदाचा कोणता अर्थ व्यक्त होतो? संकेतार्थ आज्ञार्थ स्वार्थ विध्यर्थ7. अंशाभ्यस्त शब्द निवडा. मऊमऊ लगबग कडकडाट घणघण8. पाऊस केव्हा पडला ? – ‘ केव्हा ‘ हा शब्द …. आहे उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय9. पूजा या शब्दाचे अनेकवचन कसे होईल? पूजा पूजे पुजे पुजा10. उडणारा पतंग सर्वांचे लक्ष वेधून घेत होता – या वाक्यातील ‘ उडणारा ‘ हा शब्द …. आहे धातू धातुसाधित नाम क्रियापद11. अक्कल मस्ती हुशारी मस्करी डावपेच हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे. कोकणी फारसी तेलगू कानडी12. सुंभ जळाला तरी पीळ जात नाही – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा वैभव गेले तरी अभिमान जात नाही सत्याचा विजय झाल्यावाचून राहत नाही मनुष्याचा मूळ स्वभाव बदलत नाही एखादी गोष्ट चिरकाल टिकत नाही13. मोकळी हवा भेटावी म्हणून अरुण संध्याकाळी बाहेर पडला – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा कारणबोधक उद्देशबोधक स्वरूपबोधक संकेतबोधक14. कोणत्या विभक्तीचे एकवचन आणि अनेकवचन यांचे प्रत्यय समान आहेत तृतीया पंचमी द्वितीया संबोधन15. खालीलपैकी कोणता शब्द सोने या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? धव हिरण्य कनक कांचन16. केरकचरा या सामासिक शब्दात कोणता समास आहे ? यापैकी नाही वैकल्पिक द्वंद्व इतरेतर द्वंद्व समाहार द्वंद्व17. भाववाचक नाम ओळखा. नम्रता दूध पुस्तक पीठ18. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? महत्वकांशी मृत्युंजय स्वकष्टार्जीत वानरकीवन19. मराठीतील पहिले नियतकालिक कोणते आहे? दर्पण केसरी काळ काव्यफुले20. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास आणि स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास—या चिन्हाचा वापर करतात विकल्प चिन्ह अवतरण चिन्ह स्पष्टीकरण चिन्ह संयोगचिन्ह21. आत्ता तुम्ही घरात या. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? वरीलपैकी नाही संयुक्त वाक्य गौण वाक्य केवल वाक्य22. पुढील नामाचा प्रकार ओळखा. गुलामगिरी सर्वनाम सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम23. ध्वनीच्या खुणेला …. असे म्हणतात व्यंजन स्वर अक्षर वर्ण24. पुढील वर्णापैकी कोणता वर्ण स्वतंत्र उभ्या दंडाला जोडलेला वर्ण आहे? ग ह क उ25. खालीलपैकी कोणता पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकार नाही? तृतीय चतुर्थ द्वितीय प्रथम26. रिकाम्या जागेसाठी योग्य शब्दाची निवड करा. तेथे चार पाच मोठे………..पडलेले आहे. यापैकी नाही. दगडे दगड दगुड27. माझे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. – या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. पुल्लिंग यापैकी नाही स्त्रीलिंग नपुंसक लिंग28. ब्राम्हण या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. शुक विप्र अच्युत धव29. दुरात्मा या शब्दाची संधी विग्रह कसा होईल? दू: + आत्मा दूर + आत्मा दु: + आत्मा दि: + आत्मा30. टोळभैरव’ या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे? सरळ मार्गाने जाणारे लोक दुसऱ्याच्या तंत्राने चालणारे लोक कामात मदत करणारे लोक कामात नासाडी करणारे लोक31. वाग्विहार या शब्दाची संधी कशी सोडवाल? वाक् + विहार वागव + हार वा: + विहार वाग् + विहार32. हा कोरियोग्राफर सगळ्या हीरोंना नाचवितो – क्रियापद प्रकार ओळखा संयुक्त प्रयोजक सहायक सिद्ध33. रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत या म्हणीचा अर्थ काय होतो ? मुख्य गोष्टीचा अभाव असणे. एकाला दुसरा वरचढ भेटणे. मोठ्या माणसाचा आश्रय प्रभावी असतो. कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळ टिकतो.34. घरी ….. आल्यावर बरे वाटेल जेवुन जेवून जेउन जेऊन35. देवमाणूस – या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? सज्जन मनुष्य ईश्वर संत मनुष्य36. प्रकाश जेवताना बोलत नसे – वाक्याचा काळ ओळखा रीति भूतकाळ रीति वर्तमानकाळ यापैकी नाही रीति भविष्यकाळ37. बेडूक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तयार करा बेडकीन बेडूक बेडकी बेंडुक38. खालील वाक्याचे संयुक्त वाक्यात रूपांतर करा पुस्तकाचे पाने फाडून रघुने विमान बनवले दोन्ही अयोग्य विमान बनवण्यासाठी रघुने पुस्तकाचे पाने फाडले रघुने पुस्तकाचे पाणी फाडले आणि विमान बनवले दोन्ही योग्य39. शेतकरी सर्व जगाचा पोशिंदा आहे – या ‘शेतकरी’ शब्दाचा समास कोणता? विभक्ती तत्पुरुष समास उपपद तत्पुरुष समास नत्र तत्पुरुष समास कर्मधारय समास40. फक्त 40 सैनिकांच्या तुकडीने हजार शत्रूंचा सामना केला – या वाक्यात कोणता वाक् प्रचार वापरला तरी वाक्याचा अर्थ बदलणार नाही? तोंड दिले नाकी नऊ आणले धास्ती घेतली पाठलाग केला41. दिलेल्या पर्यायातील स्वर संधी असणारा पर्याय निवडा. सन्मती वाक्पती सदाचार गुरूपदेश42. खच या शब्दाचा समानार्थी शब्द काय ? दिलेले सर्व रास गंज ढीग43. लोटा या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? लोटस लोट्या लोटा लोटी44. लिंबे हा शब्द कोणत्या शब्दाचे अनेकवचन आहे? लिंब निंबू लिंबे लिंबू45. पुरणपोळी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? अव्ययीभाव द्वंद्व तत्पुरुष बहूव्रीही46. वाक्यात एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो तेव्हा तो कोणता अलंकार असतो? यमक अलंकार उपमा अलंकार श्लेष अलंकार अनुप्रास अलंकार47. पृथ्वीचा उपग्रह चंद्र पृथ्वीभोवती फिरतो – या वाक्याचा काळ ओळखा भविष्यकाळ रीतिकाळ भूतकाळ वर्तमान काळ48. कंजूष’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? अनवधानी उधळ्या संकुचित उद्धट49. कोणता शब्द शुद्ध आहे? संयम सय्यम सयमं सन्यम50. पुस्तकांचा गठ्ठा असतो त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिकेचा……….असतो. ढीग संच पुडके गठ्ठा Loading …Question 1 of 50
39/50
1 mistek
41
49
38
wow yaar nice You so good
Send me books name u refares
40
36
50/25
41
45
35
Nice question
✨
47
45/50
39/50
46
Nice question
47
43/50
Don question nith n vachlya mule chukle
41
I m hindi medium student bt I scored 38/50
Nice question
41
41
44
46
Hi
42
45/50
rohiniburade718gmail.com
35
nice question paper
50/38
44/50
yash
47.50
33