Marathi Practice Question Paper 07 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 27 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/09/2024 1. रान हा शब्द ……. शब्द आहे तद्भव कानडी देशी तत्सम2. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य आलंकारिक शब्द निवडा. धड इकडे ना तिकडे : ? : अत्यंत मूर्ख माणूस : अकलेचा खंदक मायेचा पूत नंदीबैल त्रिशंकू टोळभैरव3. रिकामटेकडा हा ………….. शब्द आहे. गुजराती फारसी कोकणी कानडी4. परमेश्वराविषयी भक्ती पवित्र वातावरणाचे वर्णन यात …….. रस आढळतो. अद्भुत पवित्र शांत करुण5. गती या शब्दाला मान हा शब्द जोडल्यास तयार होणाऱ्या शब्दाचा योग्य पर्याय निवडा गतईमान गतीमान गतिमान गतइमान6. मूषक या शब्दाचा अर्थ काय आहे पर्यायातून निवडा. उंदीर माकड हरीण मांजर7. गणेश हा शब्द …. शब्द आहे तद्भव तत्सम देशी विदेशी8. रात्री फिरणारा – रक्तपिपासू नभचर रातकिडा निशाचर9. पुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा. चांदणे द्विगुणित पाचवा लबाड10. शुध्दलेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द पर्यायातून निवडा. प्राणीसंग्रहालय प्राणिसंग्रहलय प्राणिसंग्रहालय प्राणीसंग्रहलय11. प्रवाशांची …………….. असते. टोळी गर्दी रांग झुंबड12. ई कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन या कारान्त होते या नियमात बसणारा शब्द निवडा. पक्षी चांदणी विहीर हत्ती13. माळी या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधा माळा माळ माळी माळ्या14. लग्नासाठी मला मनाजोगा कुर्ता मिळाला या वाक्यातील दोन शब्दयोगी अव्ययापैकी कोणता एक प्रकार खाली दिला आहे ? करणवाचक योग्यतावाचक कैवल्यवाचक तुलनावाचक15. लहान दिसणाऱ्या कुस्तीपटूने मोठ्या कुस्तीपटला सहज …. – वाक्य पूर्ण होण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा राख झाली हात मारला धूळ चारली बोल लावले16. कोणत्या वाक्यात हार हा शब्द स्त्रीलिंगी आहे? खूप थकून सुद्धा महेंद्र ने हार पत्कारली नाही दिलेले सर्व गळ्यात हार घालून मधू लग्नाला गेली मोत्याच्या हार माकडाला सापडला17. स्वार्थी वाक्य ओळखा आज सुट्टी असावी आज सुट्टी आहे दिलेले सर्व आज सुट्टी द्या18. पक्षांची ही जात आता दुर्जन होत चालली आहे – या वाक्याचा अर्थ समजण्यासाठी कोणता शब्द बदलणे गरजेचे आहे? पक्षांची दुर्जन जात आता19. जगाचा नाश होण्याची वेळ – हा अर्थ सांगणारा एकच शब्द निवडा विध्वंस प्रलयकाळ अंत मोक्ष20. आजीकडून दिवा विझला गेला – यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा स्थलवाचक हेतूवाचक करणवाचक तुलनावाचक21. एकदा सांगितलेलं तुला समजत नाही का? – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? संकेतार्थी स्वार्थी प्रश्नार्थी उद्गारार्थी22. अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली. या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? शरणागती पत्कारणे. ताब्यात घेणे चकवणे धास्ती घेणे23. बोलाचीच कढी’ या आलंकारिक शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? हो ला हो म्हणणारा संकुचित वृत्तीचा केवळ शाब्दिक वचने कारस्थान करणारा24. ….. हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे बच्चा करोड तपास बटाटा25. बाजारहाट हा शब्द ….. प्रकारचा शब्द आहे अनुकरणवाचक धातुसाधित अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त26. खालील पैकी कोणते सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक आहे ? मी आम्ही ती तुम्ही27. वृत्तामध्ये लघू अक्षर अर्धचंद्राकृती (U) चिन्हाने दाखवतात तर गुरु अक्षर कोणत्या चिन्हाने दाखवतात ? आडव्या रेषेने तिरक्या रेषेने उभ्या रेषेने यापैकी नाही.28. प्रयोग ओळखा. तिचे भाषण लिहून झाले. यापैकी नाही. समापन कर्मणी शक्य कर्मणी नवीन कर्मणी29. कवितेचे चरण म्हणताना आपण मध्ये काही अक्षरानंतर थांबतो या थांबण्याच्या जागेला काय म्हणतात? यती मात्रा दीर्घ गण30. किळस, वीट, तिटकारा या भावनांचे वर्णन जेथे केलेले असते तिथे कोणता रस निर्माण होतो? शांत करुण भयानक बीभत्स31. धाबे दणाणणे या वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा. सुट्टी करणे अतिशय घाबरणे निंदा करणे नक्षा उतरवणे32. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. झाकली मूठ …….. लाखाची दीड सव्वा एक दोन33. काकांचा नरेश शेवटी रडला – या वाक्याचा प्रयोग ओळखा सकर्मक कर्तरी सकर्मक भावे अकर्मक कर्तरी कर्मणी34. व्यासंग या शब्दातील संधीचा विग्रह पर्यायातून ओळखा. व्या + संग व्यास + अंग वि + आसंग वि + संग35. सडलेला कांदा फेकून दे – विशेषण प्रकार ओळखा परिमाणवाचक अव्ययसाधित समासघटित धातुसाधित36. खेडे हा शब्द …. आहे अनेकवचनी स्त्रीलिंगी पुल्लिंगी एकवचनी37. मोतीरामरावांचा बैल मेला – या वाक्यातील ‘कर्ता’ कोणता? मोतीराम यापैकी नाही मेला बैल38. पुढीलपैकी कोणते मृदू व्यंजन नाही? फ् ज् घ् द्39. न्याय x वकील न्यायाधीश अन्याय न्यायालय40. ओ हा ……… स्वर आहे. ऱ्हस्व संयुक्त दीर्घ इंग्रजी41. खायला काळ भुईला भार या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा. निरूपयोगी मनुष्य सगळेच मुसळ केरात अति मूर्ख माणूस एखाद्याकडे पैसा असला की खूप लोक त्याच्याभोवती जमतात42. अतिशय उतावळेपणाच्या वृत्तीसाठी खालीलपैकी कोणती म्हण योग्य असेल? एका पिसाने मोर होत नाही. कावळा बसला आणि फांदी तुटली. मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ अन् कुठे ठेवू? काल मेला आणि आज पितर झाला.43. तारीख’ या शब्दाचे अनेकवचन काय होईल? वार तारखा दिनांक तारीख44. दोन वाक्यांना किंवा शब्दांना जोडणाऱ्या शब्द समूहाला काय म्हणतात? उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय45. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते त्या क्रियापदाला …. क्रियापद असे म्हणतात संयुक्त उभयविध सिद्ध द्विकर्मक46. पल्लवीकडून प्रेरणा घेऊन शीतलने अभ्यास सुरू केला – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणते आहे? अभ्यास प्रेरणा शीतलने कडून47. कोणता शब्द इतर शब्दांचा समानार्थी शब्द नाही? नीर पय जल पाणी48. कठीण प्रतिज्ञा कोणत्या शब्दाने ओळखली जाते? भीष्मप्रतिज्ञा दुर्मिळ प्रतिज्ञा अग्नीप्रतिज्ञा भीमप्रतिज्ञा49. माणसाजवळ समाधान असले पाहिजे – या वाक्याचा विचार करून योग्य पर्याय निवडा जवळ – गतीवाचक शब्दयोगी अव्यय जवळ – गतीवाचक क्रियाविशेषण अव्यय जवळ – स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय जवळ – स्थलवाचक शब्दयोगी अव्यय50. आपुलकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा भाऊबंदकी पुढारकी गावकी दुरावा Loading …Question 1 of 50
Smita dhakane 29/09/2024 at 11:23 am36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir Reply
48* only
Sir 35 padle mst test hoti
38
31/50
40
42
45/50
44 only
39/50
44 ale sir
40 sir
40
42
36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir
Mst test hoti 42 mark ale
29
33 only
40 aale sir
31
31
32
44
24/50
50/35
Mst
46/50
45