Marathi Practice Question Paper 07 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 27 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/09/2024 1. खायला काळ भुईला भार या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा. सगळेच मुसळ केरात अति मूर्ख माणूस निरूपयोगी मनुष्य एखाद्याकडे पैसा असला की खूप लोक त्याच्याभोवती जमतात2. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते त्या क्रियापदाला …. क्रियापद असे म्हणतात द्विकर्मक उभयविध संयुक्त सिद्ध3. पल्लवीकडून प्रेरणा घेऊन शीतलने अभ्यास सुरू केला – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणते आहे? कडून प्रेरणा अभ्यास शीतलने4. मूषक या शब्दाचा अर्थ काय आहे पर्यायातून निवडा. हरीण उंदीर माकड मांजर5. अतिशय उतावळेपणाच्या वृत्तीसाठी खालीलपैकी कोणती म्हण योग्य असेल? कावळा बसला आणि फांदी तुटली. एका पिसाने मोर होत नाही. काल मेला आणि आज पितर झाला. मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ अन् कुठे ठेवू?6. न्याय x वकील अन्याय न्यायाधीश न्यायालय7. बाजारहाट हा शब्द ….. प्रकारचा शब्द आहे अंशाभ्यस्त धातुसाधित अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त8. कवितेचे चरण म्हणताना आपण मध्ये काही अक्षरानंतर थांबतो या थांबण्याच्या जागेला काय म्हणतात? मात्रा यती गण दीर्घ9. कठीण प्रतिज्ञा कोणत्या शब्दाने ओळखली जाते? भीष्मप्रतिज्ञा दुर्मिळ प्रतिज्ञा अग्नीप्रतिज्ञा भीमप्रतिज्ञा10. बोलाचीच कढी’ या आलंकारिक शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? कारस्थान करणारा संकुचित वृत्तीचा हो ला हो म्हणणारा केवळ शाब्दिक वचने11. ओ हा ……… स्वर आहे. इंग्रजी संयुक्त ऱ्हस्व दीर्घ12. आपुलकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा भाऊबंदकी दुरावा गावकी पुढारकी13. स्वार्थी वाक्य ओळखा आज सुट्टी आहे दिलेले सर्व आज सुट्टी असावी आज सुट्टी द्या14. आजीकडून दिवा विझला गेला – यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा हेतूवाचक करणवाचक तुलनावाचक स्थलवाचक15. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य आलंकारिक शब्द निवडा. धड इकडे ना तिकडे : ? : अत्यंत मूर्ख माणूस : अकलेचा खंदक टोळभैरव त्रिशंकू मायेचा पूत नंदीबैल16. रान हा शब्द ……. शब्द आहे तत्सम कानडी देशी तद्भव17. धाबे दणाणणे या वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा. सुट्टी करणे अतिशय घाबरणे नक्षा उतरवणे निंदा करणे18. प्रयोग ओळखा. तिचे भाषण लिहून झाले. नवीन कर्मणी यापैकी नाही. समापन कर्मणी शक्य कर्मणी19. सडलेला कांदा फेकून दे – विशेषण प्रकार ओळखा अव्ययसाधित परिमाणवाचक समासघटित धातुसाधित20. प्रवाशांची …………….. असते. झुंबड गर्दी टोळी रांग21. रिकामटेकडा हा ………….. शब्द आहे. गुजराती कानडी फारसी कोकणी22. ई कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन या कारान्त होते या नियमात बसणारा शब्द निवडा. विहीर हत्ती चांदणी पक्षी23. मोतीरामरावांचा बैल मेला – या वाक्यातील ‘कर्ता’ कोणता? मेला यापैकी नाही बैल मोतीराम24. पक्षांची ही जात आता दुर्जन होत चालली आहे – या वाक्याचा अर्थ समजण्यासाठी कोणता शब्द बदलणे गरजेचे आहे? जात पक्षांची आता दुर्जन25. लहान दिसणाऱ्या कुस्तीपटूने मोठ्या कुस्तीपटला सहज …. – वाक्य पूर्ण होण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा बोल लावले धूळ चारली हात मारला राख झाली26. खालील पैकी कोणते सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक आहे ? ती तुम्ही मी आम्ही27. एकदा सांगितलेलं तुला समजत नाही का? – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? संकेतार्थी प्रश्नार्थी उद्गारार्थी स्वार्थी28. ….. हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे बच्चा बटाटा करोड तपास29. काकांचा नरेश शेवटी रडला – या वाक्याचा प्रयोग ओळखा सकर्मक कर्तरी सकर्मक भावे कर्मणी अकर्मक कर्तरी30. परमेश्वराविषयी भक्ती पवित्र वातावरणाचे वर्णन यात …….. रस आढळतो. अद्भुत करुण पवित्र शांत31. व्यासंग या शब्दातील संधीचा विग्रह पर्यायातून ओळखा. वि + आसंग व्यास + अंग व्या + संग वि + संग32. तारीख’ या शब्दाचे अनेकवचन काय होईल? वार तारीख दिनांक तारखा33. गती या शब्दाला मान हा शब्द जोडल्यास तयार होणाऱ्या शब्दाचा योग्य पर्याय निवडा गतिमान गतईमान गतीमान गतइमान34. शुध्दलेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द पर्यायातून निवडा. प्राणीसंग्रहालय प्राणिसंग्रहालय प्राणीसंग्रहलय प्राणिसंग्रहलय35. लग्नासाठी मला मनाजोगा कुर्ता मिळाला या वाक्यातील दोन शब्दयोगी अव्ययापैकी कोणता एक प्रकार खाली दिला आहे ? कैवल्यवाचक योग्यतावाचक तुलनावाचक करणवाचक36. दोन वाक्यांना किंवा शब्दांना जोडणाऱ्या शब्द समूहाला काय म्हणतात? शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय37. किळस, वीट, तिटकारा या भावनांचे वर्णन जेथे केलेले असते तिथे कोणता रस निर्माण होतो? भयानक करुण बीभत्स शांत38. वृत्तामध्ये लघू अक्षर अर्धचंद्राकृती (U) चिन्हाने दाखवतात तर गुरु अक्षर कोणत्या चिन्हाने दाखवतात ? उभ्या रेषेने तिरक्या रेषेने आडव्या रेषेने यापैकी नाही.39. अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली. या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? चकवणे धास्ती घेणे ताब्यात घेणे शरणागती पत्कारणे.40. रात्री फिरणारा – नभचर रक्तपिपासू निशाचर रातकिडा41. जगाचा नाश होण्याची वेळ – हा अर्थ सांगणारा एकच शब्द निवडा मोक्ष प्रलयकाळ अंत विध्वंस42. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. झाकली मूठ …….. लाखाची दीड सव्वा दोन एक43. माळी या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधा माळी माळ माळ्या माळा44. गणेश हा शब्द …. शब्द आहे विदेशी तत्सम देशी तद्भव45. कोणता शब्द इतर शब्दांचा समानार्थी शब्द नाही? नीर पाणी पय जल46. माणसाजवळ समाधान असले पाहिजे – या वाक्याचा विचार करून योग्य पर्याय निवडा जवळ – गतीवाचक क्रियाविशेषण अव्यय जवळ – स्थलवाचक शब्दयोगी अव्यय जवळ – गतीवाचक शब्दयोगी अव्यय जवळ – स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय47. खेडे हा शब्द …. आहे स्त्रीलिंगी एकवचनी अनेकवचनी पुल्लिंगी48. पुढीलपैकी कोणते मृदू व्यंजन नाही? द् फ् घ् ज्49. कोणत्या वाक्यात हार हा शब्द स्त्रीलिंगी आहे? खूप थकून सुद्धा महेंद्र ने हार पत्कारली नाही गळ्यात हार घालून मधू लग्नाला गेली मोत्याच्या हार माकडाला सापडला दिलेले सर्व50. पुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा. पाचवा द्विगुणित चांदणे लबाड Loading …Question 1 of 50
Smita dhakane 29/09/2024 at 11:23 am36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir Reply
48* only
Sir 35 padle mst test hoti
38
31/50
40
42
45/50
44 only
39/50
44 ale sir
40 sir
40
42
36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir
Mst test hoti 42 mark ale
29
33 only
40 aale sir
31
31
32
44
24/50
50/35
Mst
46/50
45