Marathi Practice Question Paper 08 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/10/2024 1. रिकामटेकडा, घरी, दलाल हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत? कानडी हिंदी गुजराती अरबी2. पुरुषवाचक सर्वनाम या संकल्पनेचा विचार करून चुकीचा पर्याय ओळखा यांच्यात वचनानुसार बदल होतो सर्व योग्य आहेत यांच्या प्रकाराची संख्या तीन आहे यांचा उपयोग पुरुषांसाठी केला जातो3. प्रेक्षकांशिवाय आयपीएल बघणे मला आवडत नाही – शब्दयोगी अव्यय प्रकार ओळखा तुलनावाचक तुलनावाचक करणवाचक व्यतिरेकवाचक4. नक्कल शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा द्वितीय प्रत प्रतिरूप स्वच्छ अस्सल5. घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. तुरंग वायस विहंग नीरज6. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारितोषीक पारीतोषीक पारीतोषिक पारितोषिक7. अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडत नाही? – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा अधिक पगाराची नोकरी सर्वांना आवडते अधिक पगाराची नोकरी कोणालाही आवडत नाही अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडते? अधिक पगाराची नोकरी कोणाला नको आहे?8. वैदेहीची शिकण्याबद्दलची तळमळ पाहून मला खूप छान वाटले. – या वाक्यातील तळमळ हा ………. शब्द आहे. अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त सामासिक अनुकरणवाचक9. पाची पांडव आपल्या कर्माचे फळ भोगायला तयार झाले – विशेषण प्रकार ओळखा क्रमवाचक साकल्यवाचक गुणवाचक आवृत्तीवाचक10. श्रेया धुतलेल्या शर्टांना सुकवते.या वाक्यातील कर्म ओळखा. शर्टांना श्रेया धुतलेल्या सुकवते11. सामान्य रूप झालेली शब्दाची विसंगत जोडी शोधा खांब – खांबास शेतकरी – शेतकराला निर्णय – निर्णयाला डोंगर – डोंगरात12. हाताच्या काकणाला आरसा कशाला ? – ही म्हण कोणता अर्थ व्यक्त करते ? सोनाराकडे भरपूर खर्च होणे आधीच वाढलेल्या व्यापात आणखी व्याप कशाला ? काही गोष्टींना पुराव्याची गरज नसते दोन वेगवेगळे मत कधीही एकत्र येऊ शकत नाही13. मी त्याच्यावतीने ….. क्षमा मागते – योग्य शब्द निवडा तुमचा तुमची तुम्हाला तुमच्याकडून14. उपमानाच्या जागी उपमेय आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी कृती घडली तर तो कोणता अलंकार असतो? व्याजस्तुती ससंदेह भ्रान्तिमान सार15. चांदी या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते? चांदण्या चांदणी चांदे चांदी16. खालील म्हण पूर्ण करा खाण तशी …. माती नाणी कहाणी खानावळ17. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवले होते सोडवले सोडवत असे सोडवत होता18. राक्षस हे खालीलपैकी कोणत्या गटात मोडतील? आसूर असुर आसारू आसूड19. तु मला काही पैसे उधार दे. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. आवृत्तिवाचक अनिश्चित गुण विशेषण क्रमवाचक20. शक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा पावसामुळे भिंत कोलमडली गेली बाबांना आता स्वतः चालवते राजपुत्राने सिंह पकडला उंदीर आणि मांजर यांचे नाते अजब आहे21. कोणतेही काम नसणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक् प्रचार ओळखा मासा मारणे माशा मारणे माशी मारणे मच्छी मारणे22. उडत्या पाखराची पिसे मोजणे – या म्हणीचा अर्थ निवडा काहीच कर्तृत्व नसताना बढाया मारणे सहजपणे एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे मशागत करून योग्य फळ मिळवणे इतरांना चमत्कार करून दाखवणे23. खालीलपैकी कोणती शब्दाची जात अविकारी आहे ? विशेषण क्रियापद सर्वनाम शब्दयोगी अव्यय24. खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंगानुसार बदलणार नाही? जे हा तू ती25. अंशु या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा किरण चंद्र ग्रह सूर्य26. ते पहा सुंदर दृश्य ! – या वाक्यातील सर्वनाम …. सर्वनाम आहे पुरूषवाचक संबंधी सामान्य दर्शक27. जर तर असा अर्थबोध करणाऱ्या क्रियापदास …. क्रियापद म्हणून ओळखले जाते आज्ञार्थी स्वार्थी विध्यर्थी संकेतार्थी28. खाताना, खेळताना, पडताना हे प्रत्यय साधित क्रियाविशेषणअव्यय खालील पैकी कोणत्या प्रकारची आहेत ? नामसाधित धातुसाधित विशेषण साधित सर्वनामसाधित29. शुद्ध शब्द निवडा. आनभीज्ञ अनभिज्ञ आकृति ओदासिन्य30. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही? भाकरी सोय सून दृष्टी31. जर बाहेर ऊन असेल तर खेळायला जाऊ नको – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा स्वरूपबोधक कारणबोधक संकेतबोधक उद्देशबोधक32. वडिलांच्या म्हणण्यानुसार आई राहुलला नेहमी पाठीशी घालते – यातील ‘पाठीशी घालणे’ या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? वाया जाणे पाठीमागे लपवून ठेवणे संरक्षण देणे नापसंती दाखवणे33. सिंहासन या शब्दाचा जसा विग्रह होतो तसा विग्रह खालीलपैकी कोणत्या शब्दाचा होतो? गोलाकार महिलाश्रम रजनीश पुरुषार्थ34. राजुला …. भरपूर शुभेच्छा मिळाल्या – वाक्य पूर्ण करा जल्मदिनी जन्म्दिनी जनमदिनी जन्मदिनी35. पृथकत्ववाचक विशेषणाचे उदाहरण कोणते पाचवी फेरी थोडा उशीर एकेक घटना छप्पन रुपये36. गप हे ….. केवलप्रयोगी अव्यय आहे शोकदर्शक मौनदर्शक विरोधदर्शक संबोधनदर्शक37. दोन गोष्टींवर अवलंबून असणाऱ्याचे काम होत नाही या अर्थाची म्हण दिलेल्या पर्यायातून निवडा. केळीला नारळी आणि घर चंद्रमोळी सारा गाव मामाचा एक नाही कामाचा दोन मांडवाचा वऱ्हाडी उपाशी अवचित पडे नि दंडवत घडे38. ओरायन – हे पुस्तक कोणी लिहिले आहे? बाळ गंगाधर टिळक इंदिरा संत सिंधुताई सपकाळ बा सी मर्ढेकर39. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा टोळ ऊ सीताराम हंस40. शेजारच्या आजीबाई खूप घाबरल्या – या वाक्यातील उद्देशविस्तार कोणता? आजीबाई शेजारच्या घाबरल्या खूप41. व्यासंग म्हणजे काय? ऋषीमुनी संन्याशी अभ्यास ओढ असणे42. आजन्म या शब्दामध्ये ‘ आ ‘ हे …. आहे विभक्ती उपसर्ग प्रत्यय सामान्यरूप43. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमुह सुचवा. उपकाराखाली ओशाळा बनलेला बेवारसी मिंधा आश्रित मंद44. वाघाची …. ऐकून सर्व प्राणी पक्षी मागे फिरले धकधक चाहूल डरकाळी धूम45. खालील पर्यायातून धातुसाधित ओळखा लढाई सावकारी शिलाई शिष्टाई46. विधूर’ या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता? विद्वान विदुषी विदेशी विधवा47. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. आक्षदा अनिष्ठ आदिवासी अनील48. तनय या शब्दाचा काय अर्थ होतो? अंग मूळ मुलगा अवयव49. जेव्हा परीक्षेची तारीख जवळ येते तेव्हा सगळेच जोमाने अभ्यासाला लागतात. – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? संयुक्त वाक्य नकारार्थी वाक्य केवलवाक्य मिश्र वाक्य50. ड् ढ् ही मृदू स्पर्श व्यंजने कोणत्या वर्गातील आहेत? क वर्ग ट वर्ग त वर्ग प वर्ग Loading …Question 1 of 50
41
30
42
48
45
42
41
Sakshi shankar shirsath
38
50/25
32
50/20
50/42
39
23
50/46
44/50
47/50
41
40
50/27
Pawan Pralhadsing Rajput
45/50
43/50
38/50
Navnath dakare
50/42
42
50/40
44
Shankar 50/35
40/50
Gautam Patil
45
40
48
50/32
46
31/50
44/50
43
41/50